Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल

कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल


Maharashtra Political Crisis : गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या असलेल्या शिंदेसेनेची रणनीती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांच्यातील संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिंदे गटाने महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. आता पक्षातून कोणाला काढायचं, कोणाला ठेवायचं यावर प्रताप सरनाईक  आणि गोगावले यांच्यातलं संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे संभाषण सुरु आहे आणि शिंदे गटाच्या निशाण्यावर सर्वप्रथम सुनील प्रभू असल्याचं कळतं.

भरत गोगावले यांनी प्रतोदपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले की, “आता हे प्रतोदाचं काम काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना? तुमची जबाबदारी आता वाढली आहे. शिवसेना पक्षाची फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांना टिकवून ठेवा, त्यांना बोलायला द्या.” त्यावर “हो सगळं व्यवस्थित करतो,” असं भरत गोगावले यांनी म्हटलं. त्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी, “केलंच पाहिजे सगळं व्यवस्थित, मागच्या प्रतोदासारखं करु नका,” अशी टिप्पणी केली. यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “मागचे प्रतोद मुंबईच्याच लोकांना जास्त बोलायला द्यायचे. तुम्ही आता प्रतोद आहात, पक्षात कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे आता तुम्ही ठरवा. सुरुवात सुनील प्रभू यांच्यापासून करा.”

सुनील प्रभू यांना प्रतोद पदावरुन बेदखल
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी काल (22 जून) बंडखोर आमदारांना एक पत्र पाठवलं होतं. वर्षा बंगल्यावर पाच वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या पत्रातून बंडखोर आमदारांना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमच्याकडे शिवसेना आमदारांचे जास्त संख्याबळ असल्याचं सांगत सुनील प्रभू यांनाच प्रतोदपदावरुन बेदखल केलं होतं. शिंदे गटाकडून आता त्यांच्या गटाच्या प्रतोदपदाची जबाबदारी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यावर देण्यात आली आहे.

Eknath Shinde : शिंदे गटाच्या निशाण्यावर सुनील प्रभू, प्रताप सरनाईक-भरत गोगावले यांच्यातलं संभाषणअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कणल #ठवयच #कणल #कढयच #ह #तमह #ठरव #सरनईकगगवल #यचयतल #सभषण #वहयरल

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

बहुप्रतीक्षित Asus ROG Phone 6 मार्केटमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज, प्रोसेसर- फीचर असतील बेस्ट, पाहा लाँच डेट

नवी दिल्ली : Asus ROG Phone 6 Luanch Date: Asus ROG Phone 6 बाबत बाजारात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. फॅन्स या ROG...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...