Saturday, August 20, 2022
Home क्रीडा कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?


मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378 रनचं आव्हान होतं, पण तेदेखील इंग्लंडने अगदी सहज पार केलं. या विजयासह इंग्लंडने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. या सीरिजच्या पहिल्या 4 टेस्ट मागच्या वर्षी झाल्या होत्या, पण टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पाचवी टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. ही टेस्ट आता खेळवण्यात आली.
मागच्या वर्षी टीम इंडिया सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर होती तेव्हा रवी शास्त्री (Ravi Shastri) टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. यावेळी राहुल द्रविडच्या प्रशिक्षणात टीम इंडिया खेळत होती. राहुल द्रविडने (Rahul Dravid) कोचिंगची जबाबदारी स्वीकारल्यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव जाणवत आहे, ज्यामुळे आता द्रविडवर टीका होऊ लागली आहे.
मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला, त्यानंतर राहुल द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली. द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टेस्टमध्ये टीमच्या पदरी फार यश अजून तरी आलं नाही. न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली तेव्हा टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 1-0 ने विजय झाला, पण कानपूरची टेस्ट ड्रॉ झाली होती. या टेस्टमध्ये टीम इंडियाने उशीरा डाव घोषित केला, त्यामुळे किवी टीमला मॅच ड्रॉ करण्यात यश आलं. टीम इंडियाच्या उशीरा डाव घोषित करण्याचं खापर तेव्हा द्रविडवर फोडण्यात आलं.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही टीम इंडिया पहिली टेस्ट जिंकली होती, पण पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये टीमच्या पदरी निराशा आली आणि 2-1 ने पराभव झाला. नव्या खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्याच घरात पराभव करण्याची संधी टीम इंडियाला चालून आली होती, पण यातही टीमला अपयश आलं. मार्च 2022 मध्ये घरच्या मैदानात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मात्र टीम इंडियाचा 2-0 ने विजय झाला होता.
रवी शास्त्री कोच असताना भारताने परदेशामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात दोनदा टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडमध्ये आघाडी घेतली होती. राहुल द्रविडला मात्र सुरूवातीला असं यश मिळवता आलेलं नाही.

Published by:Shreyas

First published:

Tags: India vs england, Rahul dravidअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कच #बदललयनतर #टम #इडयच #कमगरह #बदलल #रहल #दरवड #क #आलय #नशणयवर

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

Most Popular

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

Star Pravahवर रंगणार धम्माल म्युझिकल शो; ‘ही’ मालिका होणार बंद

मुंबई, 19 ऑगस्ट : टेलिव्हिजन विश्वात सध्या स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ठरली आहे. स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...