Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट कॉलिंग फीचरसह Realme TechLife ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, जाणून घ्या भन्नाट...

कॉलिंग फीचरसह Realme TechLife ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, जाणून घ्या भन्नाट फीचर्स आणि किंमत


नवी दिल्ली : Realme Smartwatch launched: रियलमीची (Realme) नवीन स्मार्टवॉच Realme TechLife Watch R100 भारतात लाँच झाली आहे. ही वॉच सर्क्यूल डिझाइनसह येते व यामध्ये कंपनीने कॉलिंग फीचर देखील दिले आहे. या वॉचला फक्त ३,९९९ रुपयात लाँच केले आहे. मात्र, इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत ग्राहक या वॉचला ३,९९९ रुपयांऐवजी फक्त ३,४९९ रुपयात खरेदी करू शकतात. नवीन वॉच ब्लॅक आणि ग्रे रंगात येते. या वॉचची विक्री २८ जूनला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. वॉचला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह Flipkart वरून देखील खरेदी करता येईल.

वाचा: सर्वांना दिसणार नाही प्रोफाइल फोटो, आपोआप डिलीट होणार मेसेज; पाहा WhatsApp मध्ये किती झाला बदल

Realme TechLife Watch R100 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme TechLife Watch R100 या स्मार्टवॉचमध्ये १.३२ इंच TFT LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३६०x३६० पिक्सल आहे. हा डिस्प्ले ४५० निट्स पीक ब्राइटनेससह येतो. अ‍ॅल्यूमिनियम एलॉय फ्रेम या वॉचला स्टाइलिश बनवते. वॉचच्या रियरला कंपनीने मॅट टेक्स्चर फिनिश दिले आहे, जे यूजर्सला नक्कीच आवडेल. रियलमीच्या या नवीन वॉचचे वजन फक्त ४६ ग्रॅम आहे. वॉच २२ एमएम सिलिकॉन स्ट्रॅपसह येते. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे.

वाचा: iPhone 12 च्या किंमतीत अचानक कपात! २५ हजारांची बंपर सूट, पाहा ऑफर

वॉचला तुम्ही Realme Wear App च्या माध्यमातून स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. वॉच अँड्राइड आणि आयओएसशी कंपेटिबल आहे. रियलमीच्या या वॉचमध्ये अनेक हेल्थ व फिटनेस फीचर देखील दिले आहेत. यात कंपनीने हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर, स्लीप मॉनिटर सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, १०० पेक्षा अधिक इनडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स मोड मिळतात. स्मार्टवॉचमध्ये वेदर अपडेट, अलार्म, म्यूझिक कंट्रोल आणि रिमाइंडर सारके अनेक फीचर्स मिळतात. सोबतच, वॉच महिलांच्या पीरियड डेट्सला देखील ट्रॅक करते. कॉलिंगसाठी यात बिल्ट-इन स्पीकर आणि मायक्रोफोन दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.२ चा सपोर्ट मिळतो. वॉचमध्ये ३८० एमएएचची बॅटरी दिली असून, जी सिंगल चार्जमध्ये ७ दिवस टिकते.

वाचा: Recharge Plans: मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्लान्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कलग #फचरसह #Realme #TechLife #च #नवन #समरटवच #भरतत #लच #जणन #घय #भननट #फचरस #आण #कमत

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

…त्यावेळी ब्रिटीशांना जसा आनंद झाला तसा मविआची सत्ता गेल्यावर राज्यपालांना झालाय : शिवसेना

Saamana Shiv Sena Article : काल शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरीक्षेच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली....

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...