Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय

केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय


नवी दिल्ली, 13 मे : केसांना सुंदर बनवण्यासाठी बहुतेक लोक हेअर केअर रूटीन फॉलो करतात. मात्र, अनेक उपाय करूनही काही लोकांच्या केसांची वाढ चांगली होत नाही. केस पातळ बनतात तसेच उन्हाळ्यात अनेकांचे केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, केसांच्या अनेक समस्यांवर पेरूच्या पानांचा चांगला उपयोग (Hair Care Tips) होतो.

पेरूच्या पानांचा (Guava Leaves) उपयोग करून केसांचे प्रॉब्लेम कमी करता येतात. विशेषत: उन्हाळ्यात पेरूच्या पानांचा वापर केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. अनेक पोषक तत्वांनी युक्त पेरूची पाने केसांना आवश्यक पोषण देऊन लांब, दाट आणि मुलायम बनवण्यासाठी खूप मदत करतात. घेऊया केसांची काळजी घेण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर आणि त्याचे फायदे.

पेरूच्या पानांचा हेअर मास्क बनवा –

पेरूच्या पानांपासून बनवलेला हेअर मास्क आठवड्यातून दोनदा वापरल्याने केसांची वाढ जलद होते. हेअर मास्क बनवण्यासाठी पेरूची काही पाने धुवून ब्लेंडरमध्ये बारीक करा. आता ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला लाव आणि हलक्या हातांनी मसाज करा. 30 ते 40 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

पेरूच्या पानांनी केस धुवा

पेरूच्या पानांचे पाणी केसांना निरोगी बनवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. यासाठी पेरूची पाने धुवून स्वच्छ करा. आता ती 1 लिटर पाण्यात टाकून 15-20 मिनिटे उकळवा. थंड झाल्यावर हे पाणी गाळून डब्यात भरावे. आता केस सौम्य शाम्पूने धुवा आणि कोरडे करा. त्यानंतर पेरूच्या पानांपासून बनवलेले पाणी केसांच्या टाळूवर लावा आणि 10 मिनिटे मसाज करा. थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा.

हे वाचा – लाकूड जाळून राहिलेली राख फेकू नका, त्याचा या कामांसाठी होतो चांगला वापर

पेरूच्या पानांनी केसांना तेल लावणे –

केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी केसांना तेल लावताना पेरूच्या पानांचा उपयोग करू शकता. यासाठी पेरूची पाने धुवून बारीक करा. आता या पेस्टमध्ये कांद्याचा रस आणि खोबरेल तेल घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण केसांवर आणि डोक्याच्या त्वचेला लावून मसाज करा. त्यानंतर 30 मिनिटांनी केस सौम्य शाम्पूने धुवा.

हे वाचा – चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कससठ #कध #परच #पन #वपरलयत #क #अनक #परबलमसवर #आह #सप #घरगत #उपय

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...

Smartphone Tips: डेटा Delete करुन सुद्धा स्मार्टफोन स्लो चालत असेल तर, ‘या’ सोप्पी टिप्स नक्की वापरुन पाहा

नवी दिल्ली: Increase Smartphones Speed: आजकाल प्रत्येकच युजर्सच्या फोनमध्ये अनेक Apps असतात. Apps च्या अतिवापरामुळे स्मार्टफोनमधील जंक फाइल्स वाढत जातात. याकडे वेळीच...

Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: VI Data Plans: OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ची संख्या चांगलीच मोठी आहे. हेच Disney+ Hotstar आता फक्त १५१ रुपयांमध्ये उपलब्ध आहे....