<p>आता बातमी न्यायालयाच्या एका अशा निकालाची, जो ऐकूण कदाचित तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही..केवळ ११ मिनिटे बलात्कार केला म्हणून बलात्कार प्रकरणातल्या एका दोषीची शिक्षा कोर्टानं कमी केल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. आणि त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे एका महिला न्यायाधीशानं हा निकाल दिलाय. स्वित्झरलँडमधील एका न्यायालयानं हा निकाल दिल्यानंतर शेकडो निदर्शकांनी आंदोलनं करायला सुरुवात केली आहे. जगभरातून या प्रकरणाची निंदा केली जाते. या महिला न्यायाधीशानं निकाल देताना. या पीडितेबद्दल एक संतापजनक टिप्पणी केलेय. पीडितेनं विशेष संकेत दिले असतील म्हणून ही घटना घडली असेल असं संतापजनक वक्तव्य महिला न्यायाधीशानं निकाल देताना केलं आहे. या दोषीची शिक्षा ५१ महिन्यांवरून ३६ महिन्यांवर आणण्यात आलेय. या निर्णयानंतर जगभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#कवळ #मनट #बलतकर #कल #महणन #दषच #शकष #कम #महल #नययधशच #अजब #नकल #ABP #Majha