Friday, May 20, 2022
Home करमणूक केतकी चितळे अडचणीत, शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल

केतकी चितळे अडचणीत, शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल


विनोद राठोड, प्रतिनिधी

ठाणे, 14 मे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे (Controversial Facebook Post of Actress Ketaki Chitale). केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.

केतकी चितळेने केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडिया युजर्सने केतकीला सुनावलं आहे. तसेच या पोस्टमुळे अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.

वाचा : नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार

काय म्हटलं आहे तक्रारीत?

कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मी स्वत: व माझे सारखे इतर कार्यकर्ते उद्वीग्न झालेलो आहोत. तसेच केतकी चितळे हिने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केलं आहे. सदर महिलेने आणखी देखील पोस्ट केल्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक आणि द्वेषकारक पोस्ट करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे.

यापूर्वीही केतकी चितळे वादात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका कॉमेडियनने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चौफेर टीका झाली. मात्र त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्रमक फेसबुक लिहित कॉमेडियनवर टीका करणाऱ्यांचाच समाचार घेतला होता. त्यानंतर केतकीच्या या पोस्टवरून मराठीतील ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिच्यावर निशाणा साधला होता.

‘मराठीमध्ये एक केतकी नावाची एक अभिनेत्री आहे, जी तिच्या पोस्टमधून समाजामध्ये तिढा, द्वेष कसा निर्माण होईल, याचाच प्रयत्न करत आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने महाराष्ट्राचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. जो मलाच नाही तर अनेकांना खटकला आहे,’ अशा शब्दांत महेश टिळेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना महेश टिळेकर यांनी केतकीला आक्रमक शब्दांमध्ये फटकारलं होतं.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

 • महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

  महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

 • Amravati : 'मला कुणी समजून घेत नाही… ' म्हणत 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

  Amravati : ‘मला कुणी समजून घेत नाही… ‘ म्हणत 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

 • Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

  Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

 • Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 • 'काँग्रेस पक्षाची नाराजी', नितीन राऊतांचं नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन

  ‘काँग्रेस पक्षाची नाराजी’, नितीन राऊतांचं नाना पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्याला समर्थन

 • "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  “पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

 • महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

  महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….

 • VIDEO : जळगावात दूध फेडरेशनबाहेर तुफान राडा, टँकर चालकाचा मृतदेह आणून नातेवाईकांचा ठिय्या

  VIDEO : जळगावात दूध फेडरेशनबाहेर तुफान राडा, टँकर चालकाचा मृतदेह आणून नातेवाईकांचा ठिय्या

 • Ground Report : Heat Wave मुळे उभं पीक करपलं आणि भारनियमनामुळे वावर पाण्याविना; विदर्भातल्या शेतकऱ्यांची होरपळ

  Ground Report : Heat Wave मुळे उभं पीक करपलं आणि भारनियमनामुळे वावर पाण्याविना; विदर्भातल्या शेतकऱ्यांची होरपळ

 • Live Updates : दिल्लीतल्या आगीत 16 जणांचा मृत्यू, आगीवर अद्यापही नियंत्रण नाहीच

  Live Updates : दिल्लीतल्या आगीत 16 जणांचा मृत्यू, आगीवर अद्यापही नियंत्रण नाहीच

 • 'काँग्रेसनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला', जयंत पाटलांचा पलटवार

  ‘काँग्रेसनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला’, जयंत पाटलांचा पलटवार

महाराष्ट्र

Published by:Sunil Desale

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कतक #चतळ #अडचणत #शरद #पवरबबतचय #वदगरसत #पसट #परकरण #गनह #दखल

RELATED ARTICLES

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ‘ आता हे काय ‘

मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...