Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला


मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case )सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.राज्यात ठिकठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. पण, केतकीचे वय पाहता तिला एखादा इशारा देऊन तिला सोडून द्यायला पाहिजे, असा सल्ला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी राष्ट्र्वादीला दिला आहे.

केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेते देवेंद्र फडणवीस यांनीही तिच्या या कृत्यावर निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी केतकी चितळे प्रकरणावर नवी भूमिका मांडली आहे.

केतकीने जी पोस्ट शेअर केली आहे, ते बिभत्सपणाचे आहे, पण तिचं वय पाहिलं तर तिला एक इशारा देऊन सोडून दिलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर आपण कसा केला पाहिजे, हा व्यक्ती स्वाातंत्र्याचा विषय असला तरी सर्वांचा सन्मान राखला पाहिजे. टीका जरी करायची असेल तर त्यामध्ये बिभत्सपणा नसावा. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला पाहण्यास मिळाला मी त्याचा निषेध करते’असं परखड मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

(दक्षिण महाराष्ट्रासाठी पुढचे 3 तास Alert! विजांच्या कडकडाट, वादळी पावसाची शक्यता)

मी लहानपणापासून राजकारण जवळून पाहिलं आहे. त्यावेळी काही सोशल मीडिया नव्हता. तेव्हा लोक पेपरमध्ये लिहायचे, तेव्हाही भाषा घसरायची. तेव्हा बाबांना विचारायचे तुम्ही सहन का करतात. त्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगायचे. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आता वेगळाचा अर्थ काढला जात आहे. पवारसाहेब हे मोठे नेते आहे, अशी प्रतिक्रियाही पंकजा मुंडे यांनी दिली.

केतकीला ‘तो’ मेसेज कुणी पाठवला, ती व्यक्ती कोण?

दरम्यान, केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असण्याची शक्यता आहे. यासाठी तिचा मोबाईल फॅारेन्सिक चाचणीकरता पाठवणार आहे. तसंच तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही २०२० ची पोस्ट तीने आता का केली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती मात्र ती सोशल मीडिया सॅव्ही आहे. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कशाचा वापर करत होती याचा पोलीस तपास करणार आहे. कारण पोलिसांना संशय आहे की, केतकीला कोणा एका व्यक्तीनं अथवा ग्रुपने ती पोस्ट दिली आहे असा संशय आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत.

केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ?

अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कतकल #समज #दऊन #सडन #दल #पहज #पकज #मडच #रषटरवदल #सलल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

India vs West Indies ODI Series Irfan Pathan questioned selection committee over Virat Kohli and Rohit Sharma rest Decision vkk 95

India Tour of West Indies : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय आणि...

Mumbai Rains : मुंबईत पाऊस पुन्हा सुरू, हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’; सतर्कतेचा इशारा

Rain in Mumbai : मुंबई (Mumbai) आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु...

गेमिंगची आवड आहे? तुमच्यासाठी आला १८ जीबी रॅमसह येणारा धमाकेदार स्मार्टफोन; पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली:Asus ROG Phone 6 Series Launched: Asus ने बहुचर्चित ROG Phone 6 Series ला भारतात लाँच केले आहे. कंपनीने या सीरिज अंतर्गत...

दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ, परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद 

मुंबई: सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 9...

कॅलरी बर्न करण्यासाठी Cycling की Running? कोणती एक्सरसाईज फायदेशीर?

सायकल चालवणं आणि रनिंग म्हणजेच धावणे हे दोन्ही हार्ड कोर कार्डिओ व्यायाम आहेत, पण कोणता सर्वोत्तम कोणता हे पाहूया. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघाची चीनशी बरोबरी

पीटीआय, अ‍ॅम्सटेलव्हीन भारतीय संघाला मंगळवारी महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील चीनविरुद्धच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. सलामीच्या लढतीतही   भारताची इंग्लंडशी बरोबरी झाली होती. ब-गटातील...