Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या केंद्राच्या आक्षेपानंतर राज्य सरकारने विमान प्रवासाचे नियम बदलले

केंद्राच्या आक्षेपानंतर राज्य सरकारने विमान प्रवासाचे नियम बदलले


मुंबई, 2 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून विमान प्रवासासाठी नियमावली जारी करण्यात आली होती. या दरम्यान राज्याकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या नियमावलीत (Guideline) बदल केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) केंद्र सरकारच्या सुचना लक्षात घेऊन नवी नियमावली जारी केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय (International) आणि देशांतर्गत (Domestic) विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू केलेले सगळे नियम मागे घेण्यात आले आहेत. साऊथ आफ्रिका, झिंबाब्वे आणि बोत्स्वाना या हाय रिस्क असणाऱ्या देशांसाठीच हे नियम लागू असतील, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच केंद्र सरकारने वेळोवेळी लागू केलेले आदेशच अंतिम आदेश ग्राह्य धरले जातील, असंदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

आता हाय रिस्क देश कोणते?

दक्षिण अफ्रिका, बोस्वाना आणि झिब्बाब्वे

हाय रिस्क प्रवासी कोण ?

हाय रिस्क देशांमध्ये गेल्या 15 दिवसात प्रवास केलेले लोक हे हाय रिस्क प्रवासी मानले जातील.

हाय रिस्क देशातून येणारे प्रवासी हेच हाय रिस्कर प्रवासी.

हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक

या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन राहावं लागणार. या प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाईल.

प्रवाशांची 7 दिवसानंतर पुन्हा टेस्ट होणार. टेस्ट निगेटिव्ह आली तर 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार.

इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी लसीचे दोन डोस अनिवार्य

लस घेतली नसेल तर 72 तासांचा RTPCR टेस्ट

आधीच्या नियमावलीनुसार नेमके काय बदल झाले?

राज्य सरकारने याआधी हाय रिस्क कंट्रीज यादीत 12 देशांचा उल्लेख केला होता. मात्र केंद्राच्या आक्षेपानंतर आता 12 ऐवजी 3 देशांचाच हाय रिस्क कंट्रीज समावेश करण्यात आला आहे.

देशांतर्गत विमान प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठी नियमांत शिथीलता देण्यात आली आहे.

याआधी दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्यांकरता कोविड निगेटीव्ह टेस्ट बंधनकारक होती. आता लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल तरी चालेल.

मात्र, हाय रिस्क कंट्री मधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता 7 दिवस संस्थात्मक कक्वारंटाईनमध्ये राहण्याचा नियम कायम आहे.

Published by:Chetan Patil

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कदरचय #आकषपनतर #रजय #सरकरन #वमन #परवसच #नयम #बदलल

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

पुन्हा एकदा नवं काही…

|| गायत्री हसबनीस समांतर धाटणीचे हिंदी चित्रपट करणारी अभिनेत्री शेफाली शहा इतर अभिनेत्रींपेक्षा काहीशी वेगळी आहे, अशी धारणा समीक्षकांसह इंडस्ट्रीत आहे. अनेक हिंदी मालिका,...

Tsunami : टोंगामध्ये समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक; पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता

<p>पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा...

कोहलीने कर्णधारपद सोडल्यावर BCCI काय म्हणालं पाहा

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं. भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीच्या या...

इथून माझ्या करिअरची सुरुवात झाली.. शिल्पा शेट्टीने शेअर केला खास व्हिडिओ

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. तसंच ती सोशल मीडियाद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. शिल्पाने तिच्या...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

सत्ता येताच मोफत वीज-पाणी-शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये, केजरीवालांची घोषणा

पणजी, 16 जानेवारी : पाच राज्यांच्या निवडणुकांची (5 states assembly election 2022) रणधुमाळी सुरू झाली असून गोव्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय...