Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल कॅशच्या माध्यमातून पसरू शकतो का कोरोनाचा विषाणू?

कॅशच्या माध्यमातून पसरू शकतो का कोरोनाचा विषाणू?


मुंबई : देशावरून कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. देशात 4 लाखांच्या आसपास कोरोनाचे अॅक्विव्ह रूग्ण असल्याची नोंद आहे. दरम्यान पूर्ण देशात अनलॉक करण्यात येतोय. मात्र कोरोनाचं संक्रमण थांबायचं नाव घेत नाही. दरम्यान तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. अशातच जर्मनीमध्ये करण्यात आलेला अभ्यास दिलासा देणारा आहे.

या अभ्यासामध्ये केलेल्या दाव्यानुसार, कॅश म्हणजेच पैशांच्या देवाण घेवाणीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका फार कमी असल्याचं म्हटलं आहे.

युरोपियन सेंट्रल बँकेच्या तज्ज्ञांनी रुहर-युनिव्हर्सिटी बोकमच्या मेडिकल मॉलिक्युलर व्हायरॉलॉजी विभागासह एकत्रितपणे संशोधन केलंय. यामागे कॅश म्हणजेच पैसे कोविड -19 संसर्गाच्या प्रसाराचं कारण असू शकतात का हे जाणून घेणं हा उद्देश होता. 

या अभ्यासातून समोर आलेल्या बाबी

हा विषाणू स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर अर्थात नाणी आणि नोटांवर वेगवेगळ्या कालावधीसाठी जिवंत राहिला. संसर्गजन्य विषाणू सात दिवसानंतरही स्टीलच्या पृष्ठभागावर जिवंत सापडला. परंतु 10 युरोच्या नोटवर तीन दिवसांनी व्हायरस पूर्णपणे नाहीसा झाला. 

10 सेंट नाण्यावर 6 दिवस, 1 युरो नाण्यावर दोन दिवस आणि 5 सेंटच्या नाण्यावर एका तासानंतर कोणताही विषाणू आढळला नाही. प्राध्यापक आयके स्टेनमन आणि डॉ. डॅनियल टॉड यांच्या म्हणण्याप्रमाणे, 5 सेंटचं नाणं तांब्याचं बनलेलं आहे. ज्यावर विषाणू अधिक काळ टिकत नाही.

अशा प्रकारे करण्यात आला अभ्यास

प्राध्यापक आयके स्टेनमन आणि डॉ. डॅनियल टॉड यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी एक मॉडेल तयार केलं आहे. याद्वारे हे तपासण्यात आलं की, संसर्गजन्य विषाणूचे कण कॅशेच्या माध्यमातून त्वचेवर ट्रांसफर होतात का. IScience जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांनी युरो नाणी आणि नोटांवर व्हायरस किती काळ टिकतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. यासाठी, नाणी आणि नोट्स व्हायरस सोल्यूशन एकत्र ठेवलं आणि काही दिवस निरीक्षण केलं.

डॅनियल म्हणतात की, आम्ही पाहिलं पैशांच्या कोरड्या पृष्ठभागावरून कोणतेही प्रसारण होत नाही. वास्तविक जीवनातही असंच घडतं की, नाणी किंवा नोटा ओल्या होत नाहीत. या आधारावरून असं म्हणता येईल की रोख पैशातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका खूप कमी आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कशचय #मधयमतन #पसर #शकत #क #करनच #वषण

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Salman Khan ने ज्या काळविटाला मारलं त्याचाचं गावकऱ्यांनी उभारला पुतळा

खऱ्या खुऱ्या शिंग, 800 किलो लोखंड आणि सिमेंटचा वापर करत साकारला काळविट, हरणाच्या पुतळ्याची एकच चर्चा  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Madhu Limaye : बिहारच्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा मराठी माणूस, मधू लिमयेंचा दबदबा 

Madhu Limaye : बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला. भाजपला धक्का देत...

हृदयद्रावक! राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणींना यमुनेत जलसमाधी, ४ जणांचा मृत्यू, १७ जण अद्यापही बेपत्ता

बांदा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात मोठी दुर्घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाला महिला मुलांसोबत राखी बांधण्यासाठी बोटीतून माहेरी जात असताना यमुना...

Government new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉपला, स्मार्टवॉच, फीचर फोन मोठी मागणी आहे. देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज...

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...