Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष


नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं असू शकतात. कर्करोग (cancer) हा एक असा आजार आहे, जो हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. त्याचे वेळीच निधान नाही झाले तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे (cancer symptoms) सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. याबाबत झी न्यूजने बातमी प्रसिद्ध केली आहे.

वजन कमी होणं

जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

शरीरात सूज किंवा गाठ

शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटीपोटात, स्तनात किंवा अंडकोषात गाठ कर्करोगामुळं असू शकतं.

सतत खोकला

सतत खोकला हेदेखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

तीळ किंवा चामखीळीमध्ये बदल

तीळ किंवा चामखीळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही. परंतु, ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. नवीन चामखीळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखीळ किंवा तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका.

लघवीमध्ये रक्त दिसणं

लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. म्हणजेच, तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौचाला/लघवीला जा आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रात रक्त येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

हे वाचा – आईवर प्रेम आणि मुलीसोबत करायचा चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकीनं दिला भयंकर मृत्यू

तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाची ही लक्षणं असू शकतात. याच्यामुळं पाठीच्या खालच्या भागात वेदनाही होऊ शकतात.

वेदना जाणवणं

अनेक आठवडे सतत वेदना जाणवत राहिल्यास, हीदेखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात. कर्करोगाच्या संशोधनानुसार, कर्करोगाशी संबंधित वेदना होतात. कारण, ट्यूमरमुळं हाडं, मज्जातंतू आणि इतर अवयवांवर दबाव येतो.

हे वाचा – Corona: डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे हा नवा कोरोना स्ट्रेन; भारतात आहेत का रुग्ण?

छातीत जळजळ

तुम्हाला सतत छातीत जळजळ होत असेल तर, ते कॅन्सरचं लक्षणही असू शकतं. हे पोट किंवा घशाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

अन्न गिळण्यात अडचण

अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रास होणं, खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं हीदेखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात. अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या बाबतीत हे होऊ शकतं.

हे वाचा – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे शेअर बाजारालाही धक्के; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

रात्री घाम येणं

रात्री घाम येणं हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचं धोक्याचं लक्षण असू शकतं. हे बहुतेक लिम्फोमाच्या बाबतीत घडतं. या प्रकारचा कर्करोग लिम्फॅटिक प्रणालीमध्ये होतो. लिम्फॅटिक सिस्टीम हे संपूर्ण शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्या आणि ग्रंथींचं जाळं असून कर्करोगामुळं यांत अडचणी निर्माण होतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. News 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कनसरच #अश #असतत #लकषण #बहतक #लक #शररतल #य #बदलकड #करतत #दरलकष

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

‘ कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची…’ किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई,16 जानेवारी-  गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते किरण माने   (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali...

Most Popular

इथून माझ्या करिअरची सुरुवात झाली.. शिल्पा शेट्टीने शेअर केला खास व्हिडिओ

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. तसंच ती सोशल मीडियाद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. शिल्पाने तिच्या...

covid vaccine : धक्कादायक! देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला १ वर्ष पूर्ण, पण…

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २ लाखांवर आढळून येत...

Rohit Sharma on Virat Kohli: विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला हा फोटो

नवी दिल्ली: विराट कोहलीने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. विराटने आधी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपद काढून...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

अमेरिकेत 4 जणांना ठेवलं ओलिस, बंदुकधाऱ्यानं केली ‘ही’ मोठी मागणी

न्यूयॉर्क, 16 जानेवारी: अमेरिकेतील (United States)टेक्सासमध्ये (Texas) 4 जणांना ओलीस (US Hostage) ठेवण्यात आलं आहे. लोकांना ओलीस ठेवणाऱ्यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीची सुटका...