Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या कृषीमंत्री आसाममधील चिंतन शिबिरात, शेतकरी मात्र वाऱ्यावर, संजय राऊतांचा भुसेंना टोला 

कृषीमंत्री आसाममधील चिंतन शिबिरात, शेतकरी मात्र वाऱ्यावर, संजय राऊतांचा भुसेंना टोला 


Sanjay Raut : राज्यात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवेसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास 40 आमदारांसह बंड केलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. हळूहळू शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत ठाण मांडून बसलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada bhuse) तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी टोला लगावलाय. ‘सध्या राज्यात पाऊस कमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्यानं शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या, असे म्हणत राऊतांनी भुसेंना टोला लगावलाय.

नेमकं काय म्हणालेत संजय राऊत

खरीप हंगामात कृषीमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे. पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्यानं शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या. असे ट्वीट करत संजय राऊतांनी दादाजी भुसे यांच्यावर निशाणा लगावला आहे. हे ट्वीट करताना त्यांमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी टॅग केलं आहे.

भुसे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा गट वाढताना दिसत आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे नाशिकमधील आमदार असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात.  मात्र त्या उलट भुसे हे शिंदे निकटवर्तीय असून त्यांच्यात घरोबा असल्याचे सांगितले जाते.

महत्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कषमतर #आसममधल #चतन #शबरत #शतकर #मतर #वऱयवर #सजय #रऊतच #भसन #टल

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...