Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या कुपोषणासंदर्भात कृती आराखडा तयार करा; हायकोर्टाचे न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

कुपोषणासंदर्भात कृती आराखडा तयार करा; हायकोर्टाचे न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश


Malnutrition in Maharashtra : राज्यातील कुपोषणाची समस्या केवळ आरोग्य विभागाकडून सोडवली जाऊ शकत नाही कारण तिथल्या सर्व समस्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. शिक्षणाची वानवा, बेरोजगारी, प्राथमिक वैद्यकीय सोयीसुविधा, जनजागृती इ. गोष्टीत प्रचंड सुधारणेची गरज आहे. राज्यातील संपूर्ण यत्रणेनं तिथं एकत्रित काम करावे, असा अहवाल मेळघाटातील समस्येबाबत पाहणी दौरा करणाऱ्या डॉ. चेरींग दोरजे यांनी हायकोर्टात सोमवारी सादर केला. यंदाच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मेळघाटात सुमारे 400 मुलांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी हायकोर्टात दिली. त्यावर डॉ. दोरजे यांच्या अहवालावर सर्व संबंधित विभागांनी अभ्यास करून एक कृती आराखडा तयार करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. पुढील सुनावणी 3 जानेवारीपर्यंत तहकूब केली. 

मेळघाट आणि अन्य आदिवासी भागातील मुलांचा आजही कुपोषणामुळे मृत्यू ओढावत आहे. तसेच तेथील नागरिकांना इतरही समस्या भेडसावत आहेत. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात डॉ. राजेंद्र बर्मा आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांच्यासह विविध जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाकडून तज्ज्ञांची एक समिती आणि अधिकाऱ्यांनी मेळघाट चिखलदरा, धारणी परिसात भेट दिली. धारणी, चिखलदरा येथे बैठकही पार पडली. त्या बैठकीत मेळघाटमधील विविध समस्या, औषधं, वैद्यकीय सुविधा, डॉटक्टरांची संख्या, त्यांची उपस्थिती, स्थानिक पातळीवरील उपाययोजना यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याबाबतचे फोटोही राज्याच्यावतीने कोर्टासमोर सादर केले गेलेत. मात्र, मेळघाट परिसरात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांची जागा अद्यापही रिक्त असल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी खंडपीठाला दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थानिक पातळीवर आणि नागरिकांशी संपर्क साधला जात नाही. तसं केलं तरच समस्यांवर तोडगा काढणं शक्य होईल, अशा शब्दात याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे तक्रार केली.

या संपूर्ण समस्येवर अभ्यासपूर्ण पाहाणी दौरा करून एक अहवाल सादर करण्याची जबाबदारी निर्देश हायकोर्टाने नागपूर विभागाचे आय.जी. डॉ. चेरींग दोरजे यांना दिली होती. दोरजे हे सध्या आयपीएस सेवेत असले तरी त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षणही पूर्ण कलेलं आहे. त्याचबरोबर ते ईशान्य भारतातून असल्यानं त्यांना दुर्गम भागातील समस्यांची जाण आहे. तसेच सध्या ते महाराष्ट्रात याच भागात कार्यरत असल्याने मेळघाटासंदर्भात हा पाहाणी दौरा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कपषणसदरभत #कत #आरखड #तयर #कर #हयकरटच #नययलयच #रजय #सरकरल #नरदश

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये समावेश करता येईल नवीन व्यक्तीचे नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली :Ration Card Update: Ration Card (रेशन कार्ड) हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. खासकरून BPL कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे....

IPL नंतर घरी पोहोचताच शिखर धवनची जोरदार धुलाई, जाणून घ्या काय संपूर्ण प्रकरण

मुंबई : भारताचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. प्ले ऑफपूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धवनने त्याच्या घराचा एक व्हिडिओ...

Afghanistan Blast : काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, 16 जणांचा मृत्यू

<p>काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं. अफगाणिस्तानमधल्या या स्फोटांत 16 जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि उत्तरेकडचं शहर मजार ए...

AC: टेन्टसारखा दिसणारा ‘हा’ हटके AC फक्त बेडचा एरिया करतो कूल, विजेचा वापर देखील कमी, किंमत नाही जास्त

नवी दिल्ली:Bed AC : आजकाल अनेकांच्या घरी एसी हमखास असतोच. मात्र एसी सतत चालू राहिल्याने वीज बिलही खूप येते. ज्याचा युजर्सच्या खिशावर परिणाम...

‘कुत्र्याने दर्शन घेतल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या’; ब्लॉगरचं मोदींनाच पत्र

नवी दिल्ली, 26 मे : नोएडाचा (Noida News) ब्लॉगर केदारनाथमध्ये आपल्या पाळीव कुत्र्यासह फिरायला आला होता. या हस्की जातीच्या कुत्र्याचं नाव नवाब त्यागी आहे....

घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!

महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...