Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल किमोथेरपीला करा 'बाय बाय', कॅन्सरवरही आली लस; लवकरच होणार उपलब्ध

किमोथेरपीला करा ‘बाय बाय’, कॅन्सरवरही आली लस; लवकरच होणार उपलब्ध


विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद : कर्करुग्णांसाठी तसंच कॅन्सरची रिस्क असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या काही महिन्यांमध्ये कॅन्सरची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लस शोधत असताना कर्करोगावरच्या लसीचा शोध लागला आहे. आतापर्यंत कॅन्सरवर लस नव्हती किंवा ठोस असं औषध नव्हतं अनेक उपचार आहेत मात्र ही लस जास्त चांगल्या पद्धतीनं काम करून शकेल असा विश्वास आहे. 

जीवघेण्या कॅन्सरवरही आता लस उपलब्ध होणार आहे. जर्मनीच्या बायोएनटेक लॅबमध्ये यावर महत्त्वाचं संशोधन झालं आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस शोधताना ट्युमरविरोधात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकाचा शोध लागला आहे. सर्वकाही ठीक राहिलं, तर येत्या दीड-2 वर्षांत कॅन्सरवर लस येण्याची शक्यता आहे. 

कोविड-19 व्हॅक्सिन मेसेंजर आरएनए किंवा एम-आरएनए शरिरातील प्रतिरोधक यंत्रणेला सक्षम बनवतो. जेनेटिक कोडचा आणखी लहान भाग असलेला एम-आरएनए पेशीमध्ये प्रोटीन तयार करतो. त्यामुळे सुरक्षित अँटीबॉडीज् तयार होतात. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या या प्रोटीन्सवर संशोधन करताना कॅन्सरच्या पेशींचा मुकाबला करणाऱ्या लसींवरही चाचण्या करण्यात आल्यात. 

कॅन्सरची लस आल्यानंतर किमोथेरपी, रेडिओथेरपीच्या वेदनांमधून रुग्णांना कायमची मुक्तता मिळू शकेल. कॅन्सरची हाय रिस्क असलेल्या लोकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे. विशिष्ट कर्करोग होण्याचा धोका असलेल्यांसाठी लस तयार केली जाऊ शकते. 

तोंडात घशाच्या मागचा कर्करोग (ऑरोफेरीन्जियल कॅन्सर), गर्भाशयाचा कर्करोग (सर्व्हाइकल कॅन्सर), स्तनाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर आणि विविध प्रकारच्या ट्यूमरवर ही लस प्रभावी ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र अनेक प्रकारच्या कर्करोगांसाठी एकच लस तयार करणं कठीण असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. असं असलं, तरी या संशोधनामुळे कर्करुग्णांना आणि त्याचा धोका असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कमथरपल #कर #बय #बय #कनसरवरह #आल #लस #लवकरच #हणर #उपलबध

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र भूमी पावन बनवली आहे.  याच संत परंपरेमधील एक...

फक्त २० हजारात मिळतोय दीड लाखाचा iPhone 13 Pro Max, ‘इतका’ स्टॉक आहे

नवी दिल्लीः Apple iPhone खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. लोकामध्ये आयफोन संबंधी एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. प्रत्येकाला आयफोन खरेदी करायचा आहे. परंतु,...

भारतविरुद्धच्या सामन्याआधीच पाकिस्तानला झटका, शाहीन आफ्रिदीबाबत मोठी बातमी समोर

मुंबई, 12 ऑगस्ट : यूएईमध्ये सुरू होत असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची...

Johnsons Powder: आता बाजारात मिळणार नाही जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर, कारण…

Johnson & Johnson baby powder : जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरने बाजारात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण आता तुम्हाला बाजारात...

भारतीय संघात एकामागून एक मोठे धक्के, कर्णधारानंतर आता प्रशिक्षकही बदलण्याचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय संघात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. कारण गुरुवारी भारतीय संघाचा कर्णधार बदलण्यात आला होता....