यावर्षी 10 ऑगस्टपासून पवित्र अशा मोहरमला सुरुवात झाली आहे. काल चंद्रदर्शनानंतर अलाव्यासाठी कुदळ पाडण्यात आली. त्यांनतर मग पीर बसवण्यात येतात. तब्बल 10 दिवस हा सण चालतो. शेवटचे दोन दिवस खूपच महत्वाचे असतात. नवव्या दिवसाला कत्तल रात्र म्हटल जातं. तर दहाव्या दिवसाला द्फ्फ्न म्हटलं जातं. या दिवशी पीर आपला निरोप घेतात.
इलामिक कॅलेंडर-
तसेच हिजरी कॅलेंडरमध्ये चंद्राच्या आधारे तारखा निश्चित केल्या जातात. ग्रेगोरियन कॅलेंडर आणि इस्लामिक कॅलेंडरमध्ये खूपच फरक आहे. त्यामुळे दरवर्षी मोहरमची तारीखसुद्धा मागेपुढे होत असते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये 365 नव्हे तर फक्त 355 दिवस असतात.
(हे वाचा: आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर; काय आहे या व्रताचं महत्त्व आणि पूजा विधी)
का साजरा केला जातो मोहरम?-
मुस्लिम मान्यतेनुसार मोहरम हा एक दुख व्यक्त करण्याचा महिना असतो. कारण याचं महिन्यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे आपल्या 72 साथींसोबत शहिद झाले होते. त्यामुळे हा दुख व्यक्त केला जातो. मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिलाचं महिना असतो. चंद्र दिसताच मोहरमला सुरुवात होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांची खूपच लाडकी मुलगी म्हणजे बीबी फातिमा या होय. आणि यांना दोन मुलेदेखील होती. त्यांचं नाव म्हणजे हसन हुसैन होय. इराकची राजधानी बगदादच्या करबला या गावामध्ये एक युद्ध झालं होतं. त्यालाच ‘तारीख-ए-इस्लाम’ असं म्हटलं जातं. इस्लामच्या रितीनुसार त्यांच्यामध्ये धर्माचं प्रमुख म्हणजे खलिफा निवडण्याची पद्धत आहे. हजरत मोहम्मद पैगंबरनंतर 4 खलिफा होऊन गेले. मात्र पाचवे खलिफा म्हणजेच आमिर मुअविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने आपण स्वतः खलिफा असल्याचं जाहीर केलं. मात्र इस्ल्माममध्ये अशी स्वघोषित पद्धत नव्हती.
(हे वाचा: राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता, कसा असेल तुमचा आजचा दिवस)
तसेच यजीद हा खूपच क्रूर होता. त्याला कोणतीचं व्यक्ती खलिफा मानण्यास तयार नव्हती. त्यामुळे हसनहुसैनसह सर्वच लोकांनी त्याला विरोध दर्शवला. मात्र त्याने आपल्याविरुद्ध जाणाऱ्याचं शीर धडापासून वेगळं करण्याचा आदेश दिला. मात्र तरीसुद्धा हसनने त्यांचा आदेश न मानता मक्केकडे प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र यजीद क्रोधीत झाला. आणि त्याने हसन आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी आपले सैनिक पाठविले. आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. बगदादच्या करबला येथे यजीदच्या सैन्यासोबत हसनहुसैन यांचं युद्ध झालं. आणि यामध्ये हसनसह त्यांचे 72 साथी मारले गेले. नंतर हुसैन आणि त्यांच्या 8 वर्षाच्या मुलालादेखील मारण्यात आलं. त्यामुळे हा महिना मुस्लीम बांधव दुख म्हणून साजरा करतात. आणि हसनहुसैन यांची आठवण काढतात.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#क #सजर #कल #जत #महरम #जणन #घय #इसलम #कलडरच #महततव