Thursday, May 26, 2022
Home भारत काश्मीरमधून सकारात्मक बातमी; हिंदू महिलेसाठी पाणावले मुस्लीम बांधवांचे डोळे

काश्मीरमधून सकारात्मक बातमी; हिंदू महिलेसाठी पाणावले मुस्लीम बांधवांचे डोळे


श्रीनगर 15 मे : नुकत्याच झालेल्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे दुःख आणि निराशेच्या काळात आता एक सकारात्मक घटना समोर आलेली आहे. यात 80 वर्षीय महिलेला अखेरचा निरोप देण्यासाठी मुस्लीम आणि हिंदू एकत्र आल्याचं चित्र काश्मीरच्या खोऱ्यात पाहायला मिळालं (Hindus and Muslims Together Cremated Woman In Kulgam).
चडूरा येथील तहसील कार्यालयात गुरुवारी अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने राहुल भट या लिपिकाचा मृत्यू झाला. या निर्घृण हत्येनंतर तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाला जबाबदार धरलं होतं आणि दावा केला होता की बांदीपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. गेल्या 11 वर्षांपासून घाटीत महसूल विभागात कार्यरत असलेल्या 36 वर्षीय कर्मचाऱ्याचा दुःखद अंत झाल्याने देशभरात तणाव पसरला.

VIP लोकांवर हल्ला करण्याचा आखत होता कट, सुरक्षा दलानं आवळल्या LeT दहशतवाद्याच्या मुसक्या
या घृणास्पद घटनेच्या अवघ्या दोन दिवसांनंतर शनिवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील यार खुशीपोरा येथील ग्रामस्थांनी दुलारी भट या 80 वर्षीय हिंदू महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. शेजाच्याच एका गावातील नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाली असतानाच महिलेचं निधन झालेलं.
शनिवारी पहाटे तिला वाय के पोरा येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं. तिथे फार कमी हिंदू कुटुंबं असल्याने गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचं काम स्थानिक मुस्लीम तरुणांना सोपवलं होतं.
या तरुणांनीही लगेचच संपूर्ण व्यवस्था केली. त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचे तुकडे आणले, स्मशानभूमीत मृतदेह घेऊन जाण्यासाठी एक उघडा ताबूत बनवला, फुलाच्या पाकळ्या आणि उदबत्त्या आणल्या आणि मृतदेह अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व कामं केली.

अल्पसंख्याक मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात, वेगवान कारची ट्रकला धडक

दुलारी या मट्टन अनंतनाग येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी वाई के पोरा येथे नेण्यात आलं, जिथे महिलेचे शेजारी असलेले मुस्लीम बांधव मृतदेहाची वाट पाहत होते. महिलेच्या घराजवळ काही महिला उभ्या होत्या, ज्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
“आम्ही गेली 50 वर्षे एकत्र राहतो आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी एकमेकींच्या पाठीशी उभा होतो,” असं दुलारी यांचे शेजारी साजा यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की “आमचं कुटुंब या घटनेनं दुःखात होतं पण त्यांनी अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था केली. समुदायानी असंच जगलं पाहिजे”

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कशमरमधन #सकरतमक #बतम #हद #महलसठ #पणवल #मसलम #बधवच #डळ

RELATED ARTICLES

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

नवऱ्याच्या मृतदेहासमोर नववधू ढसाढसा रडली; हत्येच्या उलगडा होताच सासरकडच्या लोकांची पायाखालची जमीनच सरकली

नवीन लग्न होतं दोघेही आनंदात होते. नातेवाईक, सण म्हणा अशा सर्वच ठिकाणी दोघेही हजेरी लावत होते.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

पटिदारच्या शतकामुळे बंगळूरुची आव्हानात्मक धावसंख्या

कोलकाता : रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत ४...

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : माझ्याबाबतच्या चर्चेत लोकांना रस -हार्दिक | Indian Premier League Cricket People interested talking hardik pandya ysh 95

पीटीआय, कोलकाता : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया आणि वादविवादांचा सामना केला आहे. आक्रमक आणि बिनधास्त वृत्तीमुळे...

IPL 2022 Eliminator RCB vs LSG: लखनऊ-बँगलोरसाठी ‘करो या मरो’, राहुलने टॉस जिंकला

कोलकाता, 25 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG vs RCB) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul)टॉस जिंकून...

IPL 2022 मध्ये दोन भावांच्या दोन कहाण्या, एक हिरो तर दुसरा झिरो!

मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 आता (IPL 2022) शेवटच्या टप्प्यावर आली आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ...

जास्त वेळ झोपल्यानं वाढते वजन; आरोग्यावर होतो वाईट परिणाम

Health Care Tips : रोज सात ते आठ तास झोप होणे अत्यंत आवश्यक असते, असे काहींचे मत असते....

रजत ठरला गोल्ड… आरसीबीचा विजयासह Qualifier-2मध्ये दणक्यात प्रवेश, लखनौचा खेळ खल्लास

कोलकाता : रजत पाटीदारचे धडाकेबाज शतक आणि त्याला मिळालेली गोलंदाजांची सुरेख साथ यावेळी आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सवर १४ धावांनी विजय साकारला आणि क्वालिफायर-२मध्ये...