वाचा:हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानचे भारताला साकडं; केली ‘ही’ मागणी!
वाचा: तालिबानची क्रूरता; वडील सैन्यात म्हणून लहान मुलाला १०० फटक्यांची शिक्षा
‘रायटर्स’ या वृत्तसंस्थेनुसार, स्फोट झालेल्या परिसरात अनेक शासकीय इमारती असून महत्त्वाच्या व्यक्तिंचे निवासस्थान आहेत. या परिसरात राष्ट्रपती भवनदेखील आहे. त्याशिवाय काही देशांचे दूतावास आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांची कार्यालये आहेत. या परिसरात वर्दळही असते.
संरक्षण मंत्री सुरक्षित
अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी खान यांनी व्हिडिओ प्रसारीत करून आपण सुखरूप असल्याचे सांगितले. आपल्या निवासस्थानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आपण व कुटुंबीय सुरक्षित आहोत. मात्र, काही सुरक्षा रक्षक जखमी झाले असल्याचे त्यांनी म्हटले. या भ्याड हल्ल्यानंतर आपण घाबरणार नसून तालिबानींना प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#कबल #सरकषण #मतरयचय #घरवर #आतमघत #हलल #चर #तस #चकमक #हललखर #ठर