Saturday, November 27, 2021
Home विश्व काबूल विमानतळावर येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर तालिबानीकडून गोळीबार, पाहा घटनेचा थरारक VIDEO

काबूल विमानतळावर येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर तालिबानीकडून गोळीबार, पाहा घटनेचा थरारक VIDEO


काबूल, 17 ऑगस्ट : तालिबानने (Taliban) काबूलसह (Kabul) जवळपास सर्वच भागांवर आपला कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तेथील लोक आपलाच देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी अफगाणिस्तानातून पलायन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक काबूल विमानतळावर पोहोचले होते. कसंही करुन या देशातून बाहेर पडण्यासाठी ते अतिशय जीवघेणा प्रवास करतानाचे काही भयंकर व्हिडीओ समोर आले.

अफगाणिस्तानचे नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला असल्याने, देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय उरला. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांची काबूल विमानतळावर गर्दी झाली. परंतु काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली. काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर (Kabul International Airport) कमर्शियल फ्लाइट्सची (Flights) उड्डाण थांबवण्यात आल्याची माहिती आहे. यातच एका नागरिकाचा काबूल विमानताळावर प्रवेश करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

जीव वाचण्यासाठी विमानाच्या इंजिनवर बसून प्रवास, टेक ऑफ करताच खाली पडले अफगाणी: पाहा Live Video

एक नागरिक काबूल विमानातळावर एका भल्यामोठ्या भिंतीवरुन विमानतळावर येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. मात्र खाली उभा असलेला तालिबानी त्या व्यक्तीवर गोळ्या झाडतो (Talibani Shoot Citizen). यात त्याला गोळी लागत नाही, परंतु तालिबानीच्या अशा कृत्यानंतर तो व्यक्ती पुन्हा भिंतीच्या पलीकडे जाताना व्हिडीओमध्ये दिसतंय.

काबूलच्या एअरपोर्टवर झाली मुंबई लोकलसारखी परिस्थिती; विमानात चढण्यासाठी नागरिकांची झुंबड, VIDEO

दरम्यान, रविवारी काबूल विमानतळावर नागरिकांची देशाबाहेर जाण्यासाठी झुंबड उडाली होती. अनेक जण विमानात जागा नसल्याने विमानाच्या टपावर, विमानाच्या थेट इंजिनालाच लटकून प्रवास करत असल्याचं समोर आलं. अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय बिकट झाली असून तालिबान्यांचं मोठं वर्चस्व निर्माण झालं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani) यांनीही देश सोडला आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कबल #वमनतळवर #यणयसठ #परयतन #करणऱय #वयकतवर #तलबनकडन #गळबर #पह #घटनच #थररक #VIDEO

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

ST Bus Strike : कामावर या, अनिल परबांनी निलंबनाबद्दल केली मोठी घोषणा

'मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...