Saturday, November 27, 2021
Home भारत काबूलहून भारतीय हवाईदलाचं C-17 विमान गुजरातमध्ये दाखल, 'वंदे मातरम'च्या घोषणा

काबूलहून भारतीय हवाईदलाचं C-17 विमान गुजरातमध्ये दाखल, ‘वंदे मातरम’च्या घोषणा


हायलाइट्स:

  • गुजरातच्या जामनगरमध्ये उतरवण्यात आलं विमान
  • भारतीय हवाईदलाच्या सी १७ ग्लोबमास्टर विमानाची मदत
  • ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा

गांधीनगर : तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर काबूलमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी – कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षित भारतात आणण्याची जबाबादारी भारतीय हवाईदलाच्या सी-१७ या विमानावर सोपवण्यात आली होती.

काल (सोमवारी) हे विमान काबूलमध्ये अडकून पडलं होतं. परंतु, मंगळवारी दुपारी १२.०० वाजल्याच्या सुमारास भारतात दाखल झालंय. सी १७ ग्लोबमास्टर हे विमान गुजरातच्या जामनगरमध्ये उतरवण्यात आलंय. या विमानात भारतीय राजदूतांसहीत जवळपास १२० जणांचा समावेश आहे. भारतात दाखल झाल्यानंतर या भारतीय नागरिकांना भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्याचं व्हिडिओतून पाहायला मिळतंय.

NSA अजित डोवाल अॅक्शनमध्ये, अफगाणिस्तातील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न
अशांत अफगाणिस्तान : एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी साधला संवाद
यापूर्वी, सोमवारी पहिलं सी १७ ग्लोबमास्टर विमानातून जवळपास १५० भारतीय भारतात दाखल झाले होते. भारतासहीत अनेक देशांनी काबूलमधील आपले दूतावास बंद केले आहेत.

उच्च पदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, जेवढे भारतीय काबूल विमानतळावर उपस्थित होते त्या सर्वांना घेऊन सी १७ ग्लोबमास्टर विमानानं उड्डाण घेतलं होतं. राजनायिक आणि राजदूतांशिवाय जवळपास ३० इतर भारतीय नागरिकही भारतीय विमानाच्या माध्यमातून भारतात दाखल होण्यात यशस्वी झालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आणखीही काही भारतीय अफगाणिस्तानात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी गरज भासल्यास आणखी एक विमान काबूलला पाठवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानात असणाऱ्या सर्व भारतीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांना सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जात आहे. काही भारतीय नागरिक अद्यापही काबूलमध्ये पोहचू शकलेले नाहीत ते अफगाणिस्तानच्या इतर शहरांत अडकले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी शरण घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवत काबूल विमानतळावर पोहचण्यासाठी शक्य ती मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचंही समजतंय.

उत्तर प्रदेश पावसाळी अधिवेशन : लोकसंख्या नियंत्रण विधेयक सादर होण्याची शक्यता
Rahul Gandhi Post: ‘फेसबुक इंडिया’ प्रमुख सत्या यादव आज NCPCR समोर होणार हजरअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कबलहन #भरतय #हवईदलच #C17 #वमन #गजरतमधय #दखल #वद #मतरमचय #घषण

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...