Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा


नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं. कानातलं मेण पूर्णपणे नैसर्गिक आहे. हे तुमच्या बाह्य कान आणि कानाच्या पडद्याला अस्तर असलेल्या पेशींद्वारे तयार केलं जातं आणि हा एक नैसर्गिक तेलकट पदार्थ आहे. कानातलं मेण खरं तर विषाणू आणि हानिकारक जीवाणूंना तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत जाण्यापासून वाचवतं. पण काही लोक हे कानातलं मेण स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. कान स्वच्छ करण्यासाठी बड्सऐवजी दुसऱ्या काही इअर वॅक्स क्लिनींग ट्रिक्सचा वापर करू शकता असं तज्ज्ञांचं (Safe ear cleaning tricks) म्हणणं आहे. कसं ते जाणून घेऊ.

तज्ज्ञ काय म्हणतात

‘झी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार, युनिव्हर्सिटी ऑफ लुईव्हिलमधील नाक, कान, घसा तज्ज्ञ (ENT specialist) जेरी लिन सांगतात की, काहीवेळा कानात दुखणं, जास्त खाज येणं किंवा इतर काही अस्वस्थतेमुळं तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. पण काही पद्धतींचा वापर करून तुम्ही कान स्वच्छ करू शकता. जेरी लिन म्हणाले की, कानाच्या वरवरच्या भागातलं थोडेसं मेण काढणं ठीक आहे. परंतु, कानाच्या जास्त आतमध्ये काडी घालणं धोकादायक ठरू शकतं.

इयर ड्रॉप्स वापरा

लिन म्हणाले की, इयर ड्रॉप्स वापरल्यानं कानातील मेण साफ होण्यास मदत होते. याच्यामुळं कानातलं मेण पातळ आणि मऊ होण्यास मदत होते. यामुळं ते कानातून बाहेर काढणं सोपं होतं. तुम्ही फार्मसी स्टोअर्समधून इयर ड्रॉप्स खरेदी करू शकता. ते सहसा ओटेक्स आणि ओटोसनसारख्या ब्रँडच्या नावानं येतात. कोणतंही औषध घेताना तुम्ही नेहमी लेबल वाचलं पाहिजे. कारण, तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की, कानात एका वेळेस किती ड्रॉप्स टाकणं योग्य आहे.

हे वाचा – या नागरिकांसाठी सर्वात फायद्याची आहे RD, स्कीमच्या या प्रकारांमध्ये करता येईल गुंतवणूक

बेकिंग सोडा द्रावण उपयुक्त ठरू शकतं

लिन म्हणाले की बेकिंग सोडा सोल्यूशन वापरल्यानं कानातले मेण काढून टाकण्यास मदत होते. ते तयार करणं सोपं आहे. तुम्ही ही पद्धत फक्त दोन आठवडे वापरावी. तुम्हाला फक्त अर्धा चमचा बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून डिस्पेंसर किंवा ड्रॉपर बाटलीत ठेवावा लागेल. नंतर द्रावणाचे पाच ते दहा थेंब कानात टाकावेत. सुमारे एक तासानंतर मेण मऊ होण्यास सुरवात होईल. यानंतर तुम्ही कान स्वच्छ करून ते स्वच्छ, कोरड्या टॉवेलनं कोरडे केल्याची खात्री करा. तुम्ही हे दिवसा करू शकता.

हे वाचा – Special News : रिकरिंग डिपॉझिटच्या व्याजदरावर परिणाम करणारे हे आहेत महत्त्वपूर्ण घटक

तेलाचा वापर उपयुक्त आहे

तुम्ही तुमचे कान स्वच्छ करण्यासाठी तेलासारखे नैसर्गिक उपाय देखील वापरू शकता. तुम्ही बेबी ऑइल, मिनरल ऑइल, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे सर्व कानातले मेण मऊ करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. हे तुम्हाला कानात घालण्यासाठी पुन्हा ड्रॉपरची बाटली वापरावी लागेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कन #सवचछ #करणयसठ #चकनह #वपर #नक #बडस #तयऐवज #य #सपय #टरकस #वपर

RELATED ARTICLES

Taliban : तालिबान मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Taliban on Girls Education : अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे...

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

Most Popular

कुणाला कशाचं तर अमिताभ यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत…

मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर...

विवाहबाह्य संबंधांमुळे महिलेला 100 चाबकाचे फटके, इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

इंडोनेशिया : विवाहबाह्य संबंध ठेवल्याबद्दल इंडोनेशियामध्ये एका महिलेला 100 चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. तर तिच्या पुरुष साथीदाराला...

तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा, ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट?

तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात येण्याआधीपासून एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ च्या सुरुवातीपासूनच...

Winter Care Tips : ग्लिसरीन त्वचेसह वाढवते केसांचे सौंदर्य, हिवाळ्यात असा करा वापर

Glycerin For Winter : त्वचा (Skin) आणि केसांची (Hair) काळजी हा आपल्या जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे. त्याकडे दुर्लक्ष...

नवरदेवला लग्नमंडपात उशीरा पोहोचणं पडलं महागात, त्यानंतर नवरीने… व्हिडीओ व्हायरल

नवरीने जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 11:40 AM (IST) स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता...