काँग्रेसची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सध्याचं राजकीय महाभारत शमलं पाहिजे. या अस्थिर परिस्थितीमुळे राज्याचं नुकसान होत आहे. हे थांबलं पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे कायम राहण्याच्या दृष्टीकोनाने आमचे विचारमंथन झाले आहे. संजय राऊतांच्या विधानावर चर्चा झाली. एक रणनीतीच्या आधारावर चर्चा झाली. भाजपने पक्षात फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ते संकट दूर करण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातून त्यांनी तसं विधान केलं आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
(राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता)
“महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्ष कायम राहील. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे, राहणार आणि त्याबाबत दुमत नाही”, असं नाना पटोले रोखठोकपणे म्हणाले.
“राज्यपाल यांचंही लक्ष आहे. महाराष्ट्रात समजा अल्पमतात सरकार आलेलं आहे तर राज्यपाल कोणाचं ऐकतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अजूनही भाजप पुढे का येत नाही? ज्यांनी महाराष्ट्रात हा सत्ता संघर्ष आणि राजकीय अस्थितरता निर्माण केली त्यांच्याजवळ अजूनही बहुमताचे आकडे आलेले नाहीत. पण पहाटेचं सरकार पडल्यापासून राज्यात अस्थितरता तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यांनी हा मोठा भूकंप आणला. आकडे अजूनही उद्धव ठाकरे सरकारच्या बाजूने आहेत”, असा दावा नाना पटोले यांनी केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#कगरस #महवकस #आघड #सरकरमधन #पठब #कढणर #नन #पटलच #सपषट #वधन