Saturday, August 20, 2022
Home भारत 'काँग्रेसकडे एकच 'नाथ', बाकी 'अनाथ''; महाराष्ट्रातील राजकारणावरुन या CM चा टोला

‘काँग्रेसकडे एकच ‘नाथ’, बाकी ‘अनाथ”; महाराष्ट्रातील राजकारणावरुन या CM चा टोला


मुंबई 01 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रचंड हालचाली होत्या. गुरुवारी अखेर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अनेक प्रयत्न करूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवता आलं नाही. यावरुनच आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनी ‘News18 लोकमत’वर पाहिला शपथविधी कार्यक्रम

शिवराज सिंह म्हणाले, की काँग्रेसही अतिशय अजब आहे. जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही (कमलनाथ), त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं. हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे असंच त्यांनीही केलं आणि बिचारे उद्धव ठाकरेही गेले. मला काँग्रेस आणि कमलनाथ दोघांच्याही विचाराची कीव येते. ना विकास करतात ना लोकांचं कल्याण करतात. काँग्रेसचे तर एकच नाथ आहेत, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री उशिरा गोव्यात जंगी स्वागत; आमदारांच्या जल्लोषाचा नवा VIDEO
यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोवा येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी शिवसेना आणि अपक्ष समर्थक आमदारांच्यावतीने त्यांचं गोव्यात जंगी स्वागत करण्यात आलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचं तोंड गोड केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कगरसकड #एकच #नथ #बक #अनथ #महरषटरतल #रजकरणवरन #य #च #टल

RELATED ARTICLES

रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...

World Mosquito Day 2022 : मलेरिया आणि इतर डासांपासून पसरणारे रोग

डासांच्या चाव्याव्दारे पसरणाऱ्या आजारांना डासांमुळे होणारे आजार असे म्हणतात. डास झिका विषाणू, वेस्ट नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू, डेंग्यू आणि मलेरिया मानवांमध्ये प्रसारित करू...

दाभोळकरांच्या हत्येला नऊ वर्ष, पुण्यात अंनिसकडून निर्भया वॉक, आढावांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत....

Most Popular

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...