Thursday, July 7, 2022
Home भारत काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..


मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे. “काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. शिवाय निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत असतो,” असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे. याबाबत वंचितने प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं?
वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, “वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरुन खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसकडून उमेदवारीची चर्चा : सूत्र
राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्यसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे consensus candidate असू शकतात का याचीही चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. या भेटीत येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये काही आघाडी होऊ शकते का याची चर्चा झाली. मात्र हे झालं पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी. स्वतः आंबेडकरांचे काय? असं कळतंय की ते राज्य सभेचे उमेदवार होऊ शकतात का, कोण समर्थन देईल आणि consensus हा होऊ शकेल का याचीही कुठेतरी चाचपणी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कगरसकडन #परकश #आबडकर #यन #रजयसभ #उमदवरचय #चरचवर #वचत #बहजन #आघडन #महटल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

पुणे जिल्हा न्यायालयाची कौतुकास्पद कामगिरी; अखेर तृतीयपंथी व्यक्तींसाठी सुरु केले स्वच्छतागृह

Pune News:  पुण्यात सगळीकडे सध्या तृतीय पंथीयांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा विधी सेवा...

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच उपांत्य फेरीत ; नदाल, फ्रिट्झचीही आगेकूच; महिलांमध्ये हालेपची बदोसावर सरशी

वृत्तसंस्था, लंडन गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दोन सेटच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना यानिक सिन्नेरवर सरशी साधत ११व्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच...

Coronavirus : कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरला? अमेरिकेतील तज्ज्ञांचा खळबळजनक दावा

Coronavirus origin : कोरोना महामारीला अडीच वर्षांचा कालावधी उलटलाय. पण अद्याप याच्या उगमस्थानाबद्दल काही समजलेलं नाही. सुरुवातील वटवाघळामार्फत...

पोटात इन्फेक्शन होतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; दुर्लक्ष करणं महागात पडेल

मुंबई, 06 जुलै : पोटाच्या संसर्गाला पोट फ्लू असेही म्हणतात. हा एक विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे तीव्र ओटीपोटात दुखण्यासोबत अनेक लक्षणे...

भारती सिंहला वाढदिवसानिमित्त पतीने दिले खास गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल | Bharti Singh Received Expensive Bag Solitaire Diamond Earrings From Haarsh Limbachiyaa birthday gift Video...

टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर...

कोण म्हणतं बॉलिवूडची पार्श्वभूमी नाही, या प्रसिद्ध अभिनेत्रीचा नातू आहे रणवीर सिंग

मुंबई: विविधांगी भूमिका आणि हट के अंदाजामुळे बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याचा उत्साह हा...