पुढे काय होणार?
ब्रिटनच्या कायद्यानुसार, विजय माल्ल्याने आता आपली सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच त्यांची उर्वरित संपत्ती दिवाळखोरी विश्वस्ताकडे (bankruptcy trustee) जमा करावी लागणार आहे. यानंतर संबंधित विश्वस्त समिती या प्रकरणाचा पुढील तपास करेल. त्यानंतर त्याच्या मालमत्तेचा आणि त्याच्याकडे असणाऱ्या कर्जाचं मुल्यांकन करण्यात येईल. यानंतर बॅड लोन म्हणून भारतीय बँकाची कर्ज भरपाई केली जाईल. यामुळे आता भारतीय बँकाचं काही प्रमाणात का होईना पण कर्ज भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजय माल्या ब्रिटनला पळून गेल्यानं मानवी हक्क्याच्या कायद्यांमुळे माल्यावर कारवाई करणं अवघड जात होतं. पण आता मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा-6 महिन्यांपूर्वी सर्वात श्रीमंताच्या यादीत असलेला तो आज अब्जाधीशही नाही कारण…
विजय माल्या याच्यावर भारतातील जवळपास 12 बँकाचं एकूण 10000 करोडहून अधिक रुपयाचं कर्ज आहे. माल्यावरील कर्जाचं प्रकरणं समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि सेबी अशा विविध संस्था माल्ल्याच्या पाठीमागे लागला. यामुळे 2016 साली विजय माल्या भारतातून ब्रिटनला पळून गेला. त्यानंतर 2017 पासून भारतीय बँका ब्रिटनमध्ये माल्याविरोधात खटला लढत आहेत. प्रत्यार्पणासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत.
हेही वाचा-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल
पण एप्रिल 2020 मध्ये, यूके उच्च न्यायालयानं प्रत्यार्पण विरोधात माल्ल्याची याचिका फेटाळून लावली होती. तेथूनच माल्याच्या अडचणींत वाढ व्हायला सुरुवात झाली होती. माल्याविरोधात भारतात फसवणूक, गुन्हेगारी षड्यंत्र, मनी लॉन्ड्रिंग आणि कर्जाची रक्कम दुसरीकडे वळवणे असे विविध आर्थिक गुन्हे दाखल आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#करजबडवय #वजय #मलयल #दवळखर #घषत #कल #यच #नमक #अरथ #कय #जणन #घय #सवसतर