Saturday, May 21, 2022
Home क्रीडा करो या मरो सामन्यात KKR साठी रसेल-बिलिंग्ज ठरले संकटमोचक

करो या मरो सामन्यात KKR साठी रसेल-बिलिंग्ज ठरले संकटमोचक


पुणे, 14 मे : उमरान मलिकने (Umran Malik) पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली. या वेगवान गोलंदाजाने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 3 बळी घेतले. परिणामी कोलकाता मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. सामन्यात (KKR vs SRH) केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 6 बाद 177 धावा केल्या आहेत. त्यामुळे हैदराबादला 178 धावांचे लक्ष्य मिळाले. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाने हा सामना जिंकला तर केकेआरचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडणारा तिसरा संघ बनेल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आधीच शर्यतीतून बाहेर आहेत. गेल्या मोसमात केकेआरचा संघ उपविजेता ठरला होता.

या सामन्यापूर्वी केकेआरने 12 सामन्यांत केवळ 5 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यात पराभव झाला आहे. हैदराबादविरुद्ध संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यानसेनने दुसऱ्याच षटकात संघाला मोठे यश मिळवून दिले. गेल्या सामन्यात चांगली खेळी खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला त्याने 7 धावांवर बाद केले. यानंतर नितीश राणा आणि अजिंक्य रहाणे यांनी 48 धावांची भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली.

उमरानचे पहिल्याच षटकात 2 बळी
उमरान मलिकने पहिल्याच षटकात केकेआरला दोन मोठे धक्के दिले. 8व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 16 चेंडूत 26 धावा करून राणा बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उमराने रहाणेलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शशांक सिंगने त्याचा अप्रतिम झेल सीमारेषेवर टिपला. त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या. यात 3 षटकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी ठरला. तो 9 चेंडूत 15 धावा करून उमरान मलिकचा तिसरा बळी ठरला. रिंकू सिंग 5 धावा करून टी नटराजनचा बळी पडला. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 119 धावा होती.

94 धावांत 5 गडी बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्सने संघाची धुरा सांभाळली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान, रसेलच्या आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण झाल्या. बिलिंग्स 34 धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 29 चेंडूंचा सामना केला. यात 3 चौकार आणि 1 षटकार मारला. रसेल 28 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिला. त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. ऑफस्पिनर सुंदरच्या शेवटच्या षटकात त्याने 3 षटकार ठोकले. या षटकात 20 धावा झाल्या.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती

Published by:Rahul Punde

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कर #य #मर #समनयत #KKR #सठ #रसलबलगज #ठरल #सकटमचक

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

21th May 2022 Important Events : 21 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

21th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण ‘या’ राशीने मात्र खर्च टाळावा

आज दिनांक 21 मे 2022 वार शनिवार. आज वैशाख कृष्ण षष्ठी. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे...

Pune : लाल महालातील लावणीचा व्हिडीओ व्हायरल; संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात (Lal Mahal) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली,...

Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट

<p>मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे...