Monday, July 4, 2022
Home विश्व करोना, इबोलासारखा आणखी एक घातक विषाणू; WHO ने दिली माहिती

करोना, इबोलासारखा आणखी एक घातक विषाणू; WHO ने दिली माहिती


हायलाइट्स:

  • आफ्रिकन देश गिनीमध्ये आणखी एक विषाणू आढळला
  • या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
  • वटवाघूळ या विषाणूचा वाहक असल्याची माहिती

जिनेव्हा: करोना महासाथीचा आजार सुरू असताना आणखी एक घातक विषाणू आढळला आहे. करोना, इबोला सारखा घातक असणारा मारबर्ग हा विषाणू आढळला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. पश्चिम आफ्रिकन देश गिनी मध्ये हा विषाणू आढळला. वटवाघूळ या विषाणूचा वाहक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गिनी देशातील दक्षिण भागातील गुकेगूमध्ये दोन ऑगस्ट रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये या मारबर्ग विषाणूची पुष्टी झाली. मारबर्ग हा इबोला, करोनासारखाच विषाणू आहे. पशूंद्वारे माणसाला या विषाणूची लागण होते. करोना विषाणूप्रमाणेच हा मारबर्ग विषाणूचा वाहक वटवाघूळ आहे. या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचा धोका हा २४ ते ८८ टक्के इतका आहे. गिनी सरकारनेदेखील हा विषाणू आढळला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘या’ देशात करोनाचा हाहाकार; दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, मारबर्ग विषाणूचा फैलाव राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर होण्याचा धोका अधिक असू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर हा संसर्ग फैलावण्याबाबत कोणतेही संकेत नाहीत. विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी गिनीमध्ये इबोला विषाणूला अटकाव करणाऱ्या आरोग्य विभागाच्या एका पथकाला जबाबदारी देण्यात आली आहे.

फ्रूट बॅट (वटवाघळाची प्रजाती) या विषाणूचा वाहक आहे. या वटवाघळांमध्ये हा विषाणू मोठ्या कालावधीपर्यंत जिवंत राहू शकतो. त्यांच्या माध्यमातून या विषाणूची लागण माणसांपर्यंत होते. हा विषाणू पहिल्यांदा १९६७ मध्ये जर्मनीतील मारबर्ग येथे आढळला होता.

करोनानंतर चीनमध्ये ‘या’ आजाराचा धोका; रुग्ण आढळल्याने चिंता वाढली
लक्षणे काय?

गिनीमध्ये मारबर्ग बाधित व्यक्तीला अचानकपणे ताप येणे, डोके दुखी, स्नायूंमध्ये वेदना जाणवणे, शरिरातील कोणत्याही भागातून रक्त येणे, उलटीमध्ये रक्त येणे आदी त्रास जाणवला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली.

उपचार काय?

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, करोना प्रमाणेच मारबर्गच्या आजारावर उपचार नाहीत. मात्र, बाधिताला आढळून आलेल्या लक्षणांवर उपचार करता येऊ शकतात. जेणेकरून त्याचा त्रास कमी होईल. आतापर्यंत ठोस औषधे, इंजेक्शन उपलब्ध झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करन #इबलसरख #आणख #एक #घतक #वषण #न #दल #महत

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...