हायलाइट्स:
- चीनमध्ये करोनाबाधितांची वाढ होत असल्याचे चिंता
- आता आणखीी एका आजाराचा रुग्ण आढळला
- या रुग्णावर बीजिंगमध्ये उपचार सुरू
अॅन्थ्रॅक्स न्यूमोनिया बाधित व्यक्ती गुरेढोरे, मेंढ्या आणि दूषित उत्पादनांच्या संपर्कात आली होती. सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने बीजिंगमधील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (बीजिंग सीडीसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे दिसून आली. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच रुग्णवाहिकेने या व्यक्तिला बीजिंगमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या रुग्णाला विलगीकरणात ठेवले असून उपचार सुरू आहेत.
वाचा:करोनाची पहिली लाट ‘या’ देशांनी थोपवली, पण डेल्टाने वाढवली चिंता!
बीजिंग सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, गुरेढोरे, मेंढ्यांमध्ये अॅन्थ्रॅक्स विषाणू असतो. आजारी पशूंच्या संपर्कात आल्यानंतर मानवाला याची लागण होण्याचा धोका असतो. संसर्गाची जवळपास ९५ टक्के प्रकरणे ही त्वचेच्या संपर्कातून आल्यामुळे होतात. संसर्गाची लागण झाल्यानंतर त्वचेवर फोड येतात आणि त्वचा संबंधित आजार होतो.
अॅन्थ्रॅक्स न्यूमोनिया हा धोकादायक असल्याचे म्हटले जाते. श्वासाच्या माध्यमातून बॅसिल्स अॅन्थ्रॅक्स(जंतू) व्यक्तीच्या शरिरात प्रवेश करतात. अॅन्थ्रॅक्स हा संसर्गजन्य आहे. मात्र, फ्लू अथवा कोविड-१९ सारखा संसर्गजन्य नाही. बॅसिल्स अॅन्थ्रॅक्स हा जंतूंचा समूह असतो. यावर अॅण्टीबायोटिक्सच्या माध्यमातून उपचार करता येणे शक्य आहे.
दरम्यान, करोनाबाधितांच्या वाढत्या संसर्गानंतर करोनाबाधित प्रांतातील नागरीक, प्रवाशांना बीजिंगमध्ये येण्यास मनाई केली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवासाशी संबंधित अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#करननतर #चनमधय #य #आजरच #धक #रगण #आढळलयन #चत #वढल