Monday, July 4, 2022
Home विश्व करोनाची पहिली लाट 'या' देशांनी थोपवली, पण डेल्टाने वाढवली चिंता!

करोनाची पहिली लाट ‘या’ देशांनी थोपवली, पण डेल्टाने वाढवली चिंता!


करोनाची पहिली लाट जगभरात थैमान घालत असताना काही मोजक्याच देशांनी करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळवले होते. चीन, ऑस्ट्रेलियासह सात देशांचे जगभरात कौतुक झाले होते. या देशांनी राबवलेल्या उपाययोजनांचीही चर्चा झाली होती. मात्र, आता करोना विषाणूच्या डेल्टा वेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवणाऱ्या देशांसमोरही डेल्टामुळे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया: कठोर निर्बंधानंतरही संसर्ग

स्थानिक पातळीवर करोनाबाधित आढळल्यानंतर संबंधित भागात कठोर लॉकडाउन निर्बंध सरकारकडून लागू करण्यात येतात. मात्र, आता या लॉकडाउनविरोधात नागरीक त्रस्त झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी हिंसक आंदोलनही झाल्याचे वृत्त आहे. सध्या न्यू साऊथ वेल्स राज्य करोना हॉटस्पॉट ठरले आहे. वेगाने फैलावणाऱ्या डेल्टा वेरिएंटला अटकाव करण्यासाठी जलदपणे किमान ५० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लसीकरणानंतर निर्बंधात शिथिलता दिली जाऊ शकते.

चीन: चाचणी आणि लसीकरणावर भर

जवळपास वर्षभरानंतर वुहानमध्ये करोनाबाधित आढळले आहेत. चीनमध्ये मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. राजधानी बीजिंगसह इतर शहरांमध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संसर्गाला अटकाव करण्यासाठी चिनी प्रशासनाने चाचणी आणि बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वुहानमध्ये चार दिवसात एक कोटी नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली. तर, दुसरीकडे वेगाने लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे.

थायलँड: नव्या आव्हानाचा सामना

मागील वर्षी २०२० मध्ये कठोर लॉकडाउन, करोना चाचणी आणि ट्रेस सिस्टीमच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग काही प्रमाणात रोखण्यात सरकारला यश आले होते. मात्र, डेल्टा वेरिएंटमुळे थायलँडसमोरील आव्हानात वाढ झाली आहे. सरकारने लसीकरणावर भर न दिल्याने संसर्ग वाढत असल्याचे आरोप तज्ज्ञांनी केला आहे. मागील महिन्यात बँकॉकमधील रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा अपुरी पडल्याने अनेकांना रेल्वेद्वारे इतर शहरात पाठवण्यात आले.

तैवान: धीम्या लसीकरणाचा फटका

जवळपास १५ महिने तैवानने आपल्या सीमा बंद ठेवल्या होत्या. चाचणी आणि ट्रेसिंगच्या माध्यमातून करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र, डेल्टा वेरिएंटविरोधात ही रणनीति प्रभावी ठरली नसल्याचे म्हटले जाते. धीम्या गतीने झालेल्या लसीकरणाचा फटका तैवानला बसला असल्याचे म्हटले जाते. सरकारने आता वेगाने लसीकरण करण्यावर भर दिला आहे.

व्हिएतनाम: डेल्टा वेरिएंटने बाधितांच्या संख्येत वाढ

करोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवलेल्या व्हिएतनाममध्ये बाधितांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटेत करोनाबाधितांची आणि करोना मृतांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेने फारच कमी होते. मात्र, डेल्टा वेरिएंटमुळे व्हिएतनाम सरकारसमोरील आव्हाने वाढली आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज सरासरी दोन ते तीन हजार बाधित आढळत आहे. व्हिएतनाम सरकारकडून संसर्गावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणही वेगाने सुरू आहे.

न्यूझीलंड: डेल्टा वेरिएंट संसर्गाची टांगती तलवार

न्यूझीलंडने पहिल्यांदा करोना मुक्त देश झाल्याची घोषणा केली होती. संसर्गावरील नियंत्रणासाठी न्यूझीलंडचे कौतुकही करण्यात आले. मात्र, न्यूझीलंडवर डेल्टा वेरिएंट संसर्गाची टांगती तलवार कायम आहे. न्यूझीलंडमध्ये लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. लसीकरण वेगाने पूर्ण न केल्यास संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करनच #पहल #लट #य #दशन #थपवल #पण #डलटन #वढवल #चत

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ; भारताच्या सलामीवीरांवर नजर

पालेकेले : श्रीलंकेविरुद्ध सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यात...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!

Liger : करण जोहरचा आगामी चित्रपट ‘लायगर’ (Liger) रिलीज पूर्वीच चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटातील विजय देवरकोंडाचा...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...