Friday, August 12, 2022
Home विश्व करोनाचा उगम चिनी प्रयोगशाळेतूनच; माणसांना बाधा होण्यासाठी विषाणूत बदल: अहवाल

करोनाचा उगम चिनी प्रयोगशाळेतूनच; माणसांना बाधा होण्यासाठी विषाणूत बदल: अहवाल


वॉशिंग्टन: मानवाला बाधा व्हावी यासाठी चीनमधील शास्त्रज्ञ करोना विषाणूंत बदल करण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या अहवालात करण्यात आला आहे. ‘कोविड १९’ साथरोगाला कारणीभूत ठरलेला हा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. सोमवारी हा अहवाल जाहीर करण्यात आला.

करोना विषाणूचा उगम कोठे झाला याबाबत अमेरिकी गुप्तहेर यंत्रणाही तपास करीत आहेत. विषाणूचा उगम चिनी प्रयोगशाळेतून झाल्याच्या निष्कर्षापर्यंत अद्याप तपास यंत्रणा पोहोचलेल्या नाहीत. मात्र, अमेरिकी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीमधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ सदस्य माइक मॅककॉल यांनी याबाबत अहवाल जाहीर केला आहे. चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’मधील (डब्ल्यूआयव्ही) शास्त्रज्ञ मानवाला लागण व्हावी यासाठी करोना विषाणूत बदल करण्यावर संशोधन करीत असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

वाचा:करोनाचा विषाणू आणखी घातक होण्याआधी नियंत्रण मिळवा; WHO चा इशारा

चिनी आणि अमेरिकी सरकारच्या निधीतून हे संशोधन होत असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. करोना साथरोगाच्या उगमाचा शोध घेण्यासाठी द्विपक्षीय तपास करण्याची गरज असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

वाचा:चीनमध्ये करोनाची नवी लाट?; बीजिंगसह १५ शहरात ‘डेल्टा’चा संसर्ग

वुहानमधील प्रयोगशाळेतून करोनाचा प्रसार झाल्याचा दावा चीनने यापूर्वी फेटाळून लावला आहे. करोनचा पहिला रुग्ण २०१९मध्ये वुहान शहरातच सापडला होता. त्या वेळी चीनने ही साथ लपवल्याचा आरोप झाले होते. वुहानमधील मासेबाजारातून करोना विषाणू पसरल्याचा दावाही यापूर्वी करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी चीनवर सातत्याने आरोप केले होते. त्यामुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव आणखीच वाढला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#करनच #उगम #चन #परयगशळतनच #मणसन #बध #हणयसठ #वषणत #बदल #अहवल

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

Most Popular

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर…

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

श्रावणात केले जाते जरा-जिवंतिकेचे पूजन; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

Jara Jivantika Puja 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना. श्रावण महिन्याला सुरुवात...

दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? पकंजा मुंडेंनी दिलं बेधडक उत्तर

मुंबई, 11 ऑगस्ट :   झी मराठीवर नव्या सुरू झालेल्या बस बाई बस हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. अभिनेता सुबोध भावे सुत्रसंचालन...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

Memes: रिषभ पंत १७ नंबरची जर्सी का घालतो? उर्वशी रौतेलाशी आहे खास कनेक्शन

पोस्टमध्ये काय म्हणाला रिषभ पंत?उर्वशीच्या या प्रकरणावर ऋषभ पंतने नाव न घेता खिल्ली उडवली. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “हे मजेदार आहे...