हायलाइट्स:
- सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव आहे जहांगीर
- नावावरून ट्विटरवर आला मीम्सचा पाऊस
- नेटकऱ्यांकडून सैफ आणि करिना पुन्हा झाले ट्रोल
जहांगीरच्या जन्मानंतर करिनाने घेतलाय मोठा निर्णय, पुस्तकातून खुलासा
जहांगीर हा मुघल साम्राज्याचा चौथा प्रशासक होता. जहांगीरने २२ वर्ष सत्ता गाजवली होती. सोबतच त्याने शीख गुरू अर्जुन देव यांना मृत्यूची शिक्षा दिली होती. यात जहांगीरचं नाव करीना आणि सैफने मुलाला दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय. मुघल राजांऐवजी इतर कोणतंही नाव करिना आणि सैफला सुचलं नाही का अशी विचारणा नेटकरी करत आहेत. सैफ आणि करिना आपल्या तिसऱ्या बाळाचं नाव औरंगजेब ठेवणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सध्या ट्विटरवर औरंगजेब ट्रेंड करत आहे.
करिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव वायरल झाल्यापासून ट्विटरवर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. काही युझर्स सैफ आणि करिना मुघल राज्यकर्त्यांची फौज तयार करणार असल्याचं म्हणत आहेत तर काही युझर्स सैफ आणि करिना मुघलांचा क्रिकेटसंघ तयार करत असल्याचं म्हणत आहेत.
पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्याने सैफ आणि करिना प्रचंड ट्रोल झाले होते. आता जहांगीर हे नाव ऐकून पुन्हा एकदा ट्रोलर्सनी सैफ आणि करिनावर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला जराही लाज वाटत नाही का, असा सवालही अनेक युझर्सनी सैफ- करिनाला विचारला आहे.
‘मोठ्या बंगल्यातून थेट छोट्याशा खोलीत शूट करायचं दडपण आलं’
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#करन #सफमळ #टवटरवर #टरड #करतय #औरगजब #नटकऱयन #वहयरल #कल #ममस