कभी ईद कभी दिवाली या त्याच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त झाला आहे. शूटिंग सुरू झालं, असं म्हणत सलमानने केलेल्या इन्स्टा पोस्टवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. पोस्टमध्ये त्याने सिनेमाचं नाव लिहिले नसलं तरी जो फोटो शेअर केला आहे. तो नव्या सिनेमातील लुक आहे. या सिनेमातील नायिका पूजा हेगडेनेही तिच्या इन्स्टावर पोस्ट करत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने सलमानचं आयकॉनिक ब्रेसलेट घातलं आहे.
अचानक मोडलं नाही सोहेल- सीमाचं लग्न, ३ महिन्यांपूर्वी दिलेली हिंट
सलमानचा नवा सिनेमा कोणता या प्रश्नाचं उत्तर तर त्याच्या चाहत्यांना मिळालं आहे. या सिनेमात सलमनाने मानेवर रूळणारे केस असा लुक केला आहे. सलमानच्या स्टाइलवर त्याचे चाहते कायमच फिदा असतात. त्याच्या नव्या सिनेमात लांब केस, डॅशिंग लुक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्याच्या कभी ईद कभी दिवाली या सिनेमाचं शूटिंग मुंबईत सुरू आहे. त्यासाठी भव्य सेट उभारण्यात आला आहे. तेलगु अभिनेता वेंकटेश दग्गुबाती हादेखील प्रमुख भूमिकेत आहे. तर पूजा हेगडे सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
कोट्यवधींच्या संपत्तीत सीमा खान देते सोहेलला टक्कर, जाणून घ्या दोघांच्या नेटवर्थ आणि प्रॉपर्टीबद्दल
यापूर्वी सलमानने तेरे नाम या सिनेमात कपाळावर येणाऱ्या केसांचा बटा असा लुक केला होता. तो लुकही खूप गाजला होता. तर अंतिम या सिनेमात सलमान शीख पोलिसाच्या भूमिकेत दिसला. त्या सिनेमासाठीही त्याचे केस लांब दाखवण्यात आले होते. आता पुन्हा वाढलेल्या केसांच्या लुकमध्ये भाईजान सलमानला पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. नुकतंच सलमानने टायगर ३ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ दिसणार आहे. सूर्यवंशीनंतर कतरिना या सिनेमात दिसणार आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#कभ #ईद #कभ #दवलमधल #सलमन #खनच #लक #Viral #फनस #पनह #एकद #भईजनचय #परमत