Saturday, July 2, 2022
Home भारत कपिल सिब्बल यांच्या घरी डिनरचं आयोजन; विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते बैठकीला हजर,...

कपिल सिब्बल यांच्या घरी डिनरचं आयोजन; विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते बैठकीला हजर, काय आहे कारण?


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: काँग्रेस नेते (INC) कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सोमवारी आपल्या तीन मूर्ती लेन निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनर पार्टीमध्ये (Dinner Party) जवळपास एक डझनहून अधिक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याबाबत आणि भारतीय जनता पार्टीला (BJP) 2022 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (Uttar Pradesh Assembly Election) आणि 2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभूत करण्याबाबत चर्चा केली आहे. सिब्बल यांनी सोमवारी या डिनरचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनात्मक सुधारणांसाठी पत्र लिहिणारे ‘जी -23’ चे जवळपास सर्व सदस्य उपस्थित होते.

डिनरसाठी हजेरी लावलेल्या एका विरोधी पक्षाच्या नेत्यानं सांगितलं की, “एकता आणखी बळकटीसाठी अशा आणखी बैठका आयोजित केल्या पाहिजेत.” आम्हाला आधी उत्तर प्रदेशात 2022 मध्ये आणि नंतर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला पराभूत करायचं आहे. राजदचे लालू प्रसाद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव, माकपचे सीताराम येचुरी, भाकप (भारतीय कम्युनिस्ट पार्टी) चे डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम आदी वरिष्ठ नेते या डिनरसाठी उपस्थित होते.
हेही वाचा-पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली UN Security Council ची बैठक
याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी आणि डेरेक ओ ब्रायन, बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा आणि अमर पटनायक, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम) तिरुची शिवा आणि टीके एलनगोवन, रालोदचे (राष्ट्रीय लोकदल) चे जयंत चौधरी आणि टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) चे नेतेही या डिनरला उपस्थित होते. या डिनरमध्ये अकाली दलाचे नेते नरेश गुजराल देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. सिब्बल यांच्या या डिनरमध्ये YSRCP आणि TDP चे नेतेही उपस्थित होते.
हेही वाचा-स्वा. सावरकरांचं ‘हिंदूराष्ट्र’ काँग्रेसला मान्य? VIDEO नंतर पक्षात खळबळ
तसेच सिब्बल यांनी आयोजित केलेल्या या डिनरमध्ये सहभागी झालेल्या G-23 नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, भूपिंदर सिंग हुड्डा, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी आणि शशी थरूर सहभागी होते. G-23 काँग्रेस नेत्यांची अशी पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे. सूत्रांनी सांगितलं की, कपिल सिब्बल यांच्या सुरुवातीच्या मनोगतानंतर सर्व नेत्यांची उत्तर प्रदेशातील 2022 सालच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. संबंधित निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र यावं लागेल, याबाबतही चर्चा झाली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कपल #सबबल #यचय #घर #डनरच #आयजन #वरध #पकषच #वरषठ #नत #बठकल #हजर #कय #आह #करण

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

पीटीआय, स्टॉकहोम : ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी ८९.९४ मीटर अंतरासह स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत दुसरे स्थान...

जुना-नवीन अँड्रॉयड स्मार्टफोन गरम होतोय?, या १० ट्रिक्सचा वापर करून ठेवा थंड

नवीन फोन खरेदी केल्यानंतर आपण हाच विचार करतो की, आता कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. फोनची मेमरी खाली आहे. फोन हँग होणार नाही....

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला....

Cashback Offers: ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

नवी दिल्ली:Airtel Offers: स्मार्टफोन खरेदी करतांना सूट व्यतिरिक्त ६ हजार रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळाला तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. महत्वाचे म्हणजे सध्या अशीच...

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

<p class="title style-scope ytd-video-primary-info-renderer">State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त</p> <p id="info" class="style-scope ytd-video-primary-info-renderer">&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...