Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल कधी हे ऐकलं होतं का? लिव्हर, किडनी, डोळ्यांसारख्या प्रत्येक अवयवासाठी असतो वेगवेगळा...

कधी हे ऐकलं होतं का? लिव्हर, किडनी, डोळ्यांसारख्या प्रत्येक अवयवासाठी असतो वेगवेगळा आहार


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : आपलं आरोग्य उत्तम (Health) राहण्यासाठी आहार (Diet) चांगला असावा लागतो. म्हणूनच आपण वेगवेगळ्या पदार्थांचा  आहारामध्ये (Different Type of Food For Diet)  समावेश करतो. फळं, भाज्या, डाळी, तांदूळ, पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, ज्युस यासारख्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे मिनरल्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स मिळतात. आपण जो आहार घेतो तो संपूर्ण शरीरावर (Effect on Body) परिणाम करत असतो. मात्र प्रत्येक अवयवासाठी एक ठराविक आहार असतो. असं देखील तज्ज्ञांचं मत आहे.
प्रत्येक अवयवासाठी ठराविक पदार्थ
शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळे आहे त्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारे पोषक (Nutrition) घटक देखील वेगवेगळे असतात. म्हणूनच प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळ्या पदार्थाची गरज असते.
(हा गाडीवाला रोज तयार करतो ‘खुनी ज्यूस’! ‘भयंकर हेल्दी’ ज्यूसचा VIDEO होतोय VIRAL)
डोळ्यांसाठी गाजर
डोळ्यांसाठी गाजर फायदेशीर मानलं जातं. यामध्ये बिटा केरोटीन, व्हिटॅमिन ए आणि अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट (Antioxidant) असतात. ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, इन्फेक्शन किंवा कोणतेही आजार दूर राहतात. याशिवाय केळं,पालक,लाल रंगाची शिमला मिरची देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे.
(‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला)
तल्लख मेंदूसाठी अक्रोड
आपला मेंदू आपलं शरीर कंट्रोल करत असतो. त्यामुळे मेंदू तल्लख असणं महत्त्वाचं असतं. मेंदूच्या आरोग्यासाठी आक्रोड,साल्मन फिश खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड व्हिटॅमिन, अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. याशिवाय आवळा, हळद, ब्रोकोली आणि भोपळ्याच्या बिया देखील खायला हव्यात.
हृदयासाठी टोमॅटो
हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते. टोमॅटोमध्ये पोटॅशियम भरपूर मात्रेमध्ये असतं. टोमॅटोमधील लायकोपीन शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणतात. याव्यतिरिक्त आवळा, हिरव्या भाज्या, डार्क चॉकलेट, अवकाडो देखील खाऊ शकता.
(कितीही रडलं,चिडलं तरी जेवण भरवा!बाळासाठी पोषण महत्त्वाचं; हे आहेत Healthy पर्याय)
फुफ्फुसांसाठी हळद आणि शिमला मिरची
फुप्फुसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हळद आणि शिमला मिरची खाणं उत्तम मानलं जातं. हळदीमध्ये इन्फॉमेशन कमी करणारे घटक असतात. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असतं. यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. आवळा, सफरचंद, बीट, भोपळा, टोमॅटो खाण्याने फायदा होतो.
हाडांसाठी डेअरी प्रोडक्ट आणि सलम फि
हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असतं. याशिवाय सालमन फिशमध्ये देखील व्हिटॅमिन डी असतं. ब्रोकोली, सोयामिल्क, डाळ, अंजीर, मनुका यामुळे हाडं मजबूत राहतात.
(तुम्हालाही वाटतो भाजी चिरणं हा Task? ही पद्धत वापरून वाचवा वेळ, वाढेल पोषण)
पोटा करता दही आणि पपई
पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पचन व्यवस्था चांगली असावी लागते. यासाठी दही, पपई खावी. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आहेत. पपई खाल्ल्यामुळे बद्धकोष्टता दूर होते. पोट फुगणं यासारखे त्रास कमी होतात. याव्यतिरिक्त सफरचंद, सब्जा आणि फायबर असणारे पदार्थ घ्यावेत.
यकृताच्या आरोग्यासाठी पपई आणि लिंबू
लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पपई,लिंबू जरूर खावं. पपई लिव्हर डिटॉक्स करते तर, लिंबू लिव्हर सेल्स सक्रीय करता. याशिवाय आवळा, लसूण, ग्रीन टी आणि हळद देखील खायला हवी.
किडनीसाठी लसूण आणि शिमला मिरची
रक्त स्वच्छ करून त्यातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्याचे काम किडनी करत असते. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी लसूण आणि शिमला मिरची खाऊ शकता. लसणामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस असतं तर, शिमला मिरची मध्ये व्हिटॅमिन आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट आहेत. याशिवाय आवळा,पालक, अननस, कोबी देखील खाणं कीडनीसाठी फायदेशीर आहे.
(चहा अतिप्रमाणात उकळू नका; या 7 पद्धतीने तयार करा Healthy Tea)
केसांसाठी अंड पालक
फॅटी फिश, ड्रायफ्रूट आणि रताळे खाल्ल्याने केस मजबूत होतात.
चांगल्या त्वचेसाठी
सूर्यफुलाच्या बिया, आक्रोड, टोमॅटो, लिंबू आणि ग्रीन टी घेतल्याने त्वचा चांगली होते.
मजबूत दातांसाठी
दूध,दही, ड्रायफ्रूट्स, सफरचंद, हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
स्नायूंच्या मजबुतीसाठी
अंड, चिकन ब्रेस्ट, दूध, क्विनोआ, टोफू, चणे असणे हे पदार्थ खाणं फायदेशीर आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कध #ह #ऐकल #हत #क #लवहर #कडन #डळयसरखय #परतयक #अवयवसठ #असत #वगवगळ #आहर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

कॅन्सरची लागण झाल्यावर टॉयलेट दरम्यान दिसतात ही २ लक्षणं, ९० टक्के रुग्णांना असते ही समस्या, अजिबातच दुर्लक्ष करू नका

Cancer Symptoms : तुम्ही टॉयलेटला जाता तेव्हा तुम्हाला रोजच्या पेक्षा काही गोष्टी असमान्य वाटतात. तर लगेचच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही गोष्ट...

‘या’ ठिकाणी सापडलाय दुतोंडी दुर्मिळ साप,फोटो पाहून थक्क व्हालं

असा दुतोंडी दुर्मिळ साप तुम्ही पाहिलाच नसेल,फोटो एकदा पाहाच अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

अब्जाधीश बिझनेसमॅनची पत्नी दिव्या खोसलाने लग्नाचा लेहंगा घालून केली सोशल मीडियाची हवा टाइट, लो-कट चोळीतील लुक ठरला काळजाचं पाणी करणारा..!

दिव्या खोसला कुमार (divya khosla Kumar) हे नाव चित्रपटसृष्टीत जास्त पॉप्युलर नसलं तरी अल्बम सॉंग इंडस्ट्रीमुळे तरुणाईच्या मनामनांत पोहोचलं आहे हे तुम्ही देखील...

ENG vs IND | इंग्लंड विरुद्ध वन डे, टी 20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

ENG vs IND | इंग्लंड विरुद्ध सामन्यात कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

WhatsApp कॉलिंग दरम्यान डेटा लवकर संपतो? सेटिंगमध्ये करा ‘हा’ छोटासा बदल

नवी दिल्ली :WhatsApp call: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सची संख्या मोठी आहे. आता WhatsApp चा वापर केवळ चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही....

Nia Sharma पुन्हा एकदा बोल्डनेसचमुळे चर्चेत, पाहा सिझलिंग लुक

Nia Sharma पुन्हा एकदा बोल्डनेसचमुळे चर्चेत, पाहा सिझलिंग लुक अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...