Thursday, July 7, 2022
Home क्रीडा ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव क्रिकेट मॅच; या देशाने जिंकले होते सुवर्णपदक

ऑलिम्पिक इतिहासातील एकमेव क्रिकेट मॅच; या देशाने जिंकले होते सुवर्णपदक


मुंबई : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका समितीची स्थापना केली आहे. आयसीसी आठ वर्षानंतर होणाऱ्या लॉस एजिलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्यासाठी बोली लावणार आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता असल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला.

जगभरातील अनेक देशात क्रिकेट खेळला जात असला तरी ऑलिम्पिक सारख्या सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत त्याचा समावेश नाही. राष्ट्रकुल सारख्या स्पर्धेत देखील क्रिकेटचा समावेश नाही. आता २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची सुरूवात १८९६ साली झाली होती. म्हणजे ऑलिम्पिकला १२५ वर्षाचा इतिहास आहे. या काळात ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात फक्त एकच क्रिकेटची मॅच झाली आहे. १९०० साली पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत १४ देशांनी सहभाग घेतला होता.

पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता, पण…

१८९६ साली अथेन्स येथे झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण अपेक्षित देशांनी सहभाग नोंदवला नसल्याने आयोजिकांनी हा खेळ स्पर्धेतून रद्द केला. त्यानंतर चार वर्षांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याचा समावेश करण्यात आला. तेव्हा देखील फार प्रतिसाद मिळाला नाही. फक्त चार देशांनी भाग घेतला. त्यातील एक यजमान देश फ्रान्स होते.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी नेदरलँड आणि बेल्जियम यांना फ्रान्ससोबत सह यजमानपद मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला होता. पण या दोन्ही देशांचे सह यजमानपद गेल्याने त्यांनी क्रिकेटमधून माघार घेतली. त्यामुळे दोनच देश शिल्लक राहिले एक यजमान फ्रान्स आणि दुसरे ग्रेट ब्रिटन होय.

१९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १९ क्रीडा खेळात ९५ इव्हेंट्स झाले होते. यात ९९७ जणांनी (९७५ पुरुष आणि २२ महिला) सहभाग घेतला होता. क्रिकेटमध्ये तेव्हा चार देशांनी सहभाग घेतला होता. यात ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम यांचा समावेश होता. या चार देशात नॉकआउट फेरी नियोजित होती आणि त्यानंतर अंतिम मॅच खेळवली जाणार होती.

ऑलिम्पिक सुरू होण्याआधी नेदरलँड आणि बेल्जियम या देशांनी माघार घेतल्याने स्पर्धेत फक्त दोनच संघ शिल्लक राहिले. यामुळे कांस्यपदकाची मॅच झाली नाही. एकच मॅच खेळवण्यात आली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ती एकमेव मॅच ठरली. तेव्हा वनडे क्रिकेटचा उदय झाला नव्हता फक्त कसोटी क्रिकेट अस्तित्वात होते.

ऑलिम्पिकमध्ये झालेल्या एकमेव सामन्याचे पोस्टर (फोटो-wikipedia)

ऑलिम्पिकमध्ये दोन दिवसांची मॅच खेळवण्यात आली. ही मॅच व्हेलोद्रोम दे व्हिन्सेनेस येथे १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवसांत खेळवण्यात आली. गंमत म्हणजे या सामन्यासाठी नाणेफेक झाली नव्हती. ग्रेट ब्रिटनने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांनी पहिल्या डावात ११७ धावा केल्या. उत्तरा दाखल फ्रान्सचा संघ ७८ धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात ब्रिटनने ५ बाद १४५ धावा केल्या. त्यांनी फ्रान्सपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले. दुसऱ्या डावात फ्रान्सचा फक्त २६ धावांवर डाव संपुष्ठात आला. ही मॅच ब्रिटनने १५८ धावांनी जिंकली आणि ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. तर पराभव झालेल्या फ्रान्सला रौप्यपदक मिळाले. तिसरा संघच नसल्याने कांसपदक कोणालच मिळाले नाही.

सामना संपण्याच्या पाच मिनिटे आधी झाला ड्रामा

इंग्लंडने मोठ्या फरकाने ही लढत जिंकली असली तरी सामना संपण्याच्या पाच मिनिटे आधी इंग्लंडला रौप्य पदक तर फ्रान्सला कांस्यपदक जाहीर करण्यात आले. पण या लढतीला १९१२ च्या ऑलिम्पिकमध्ये मान्यता देण्यात आली आणि ब्रिटनला सुवर्ण तर फ्रान्सला रौप्य पदक जाहीर करण्यात आले.

ही मॅच ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स अशा दोन देशात झाली असली तरी फ्रान्सच्या संघाची नोंद मिश्र संघ अशी करण्यात आली. कारण या संघात ११ ब्रिटिश नागरिक होते. तर दोन फक्त फ्रान्समधील होते. या सामन्यात दोन्ही संघात प्रत्येकी १२ खेळाडू होते.

ब्रिटनच्या पहिल्या डावात फक्त चार जणांना दुहेरी धावसंख्या करता आली. फेडरिक कमिंगने सर्वाधिक ३८ तर कर्णधार सीबीके बीचक्रॉफ्ट यांनी २३ धावा केल्या. फ्रान्सकडून डब्ल्यू अँडरसनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अन्य सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. पहिल्या डावात फ्रान्सला १०० धावांपर्यंत मजल गाठता आली नाही. संघातील फक्त तिघा फलंदाजांना दुहेरी धावा करता आल्या. फ्रान्सकडून १२व्या फलंदाजाने सर्वाधिक २५ धावा केल्या. इंग्लंडकडून एफ डब्ल्यू ख्रिश्चन यांनी सात विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात इंग्लंडने जोरदार फलंदाजी केली. ब्रिटनकडून अल्फ्रेड बॉवरमन यांनी सर्वाधिक ५९ तर कर्णधार सीबीके बीचक्रॉफ्ट यांनी ५४ धावांची खेळी केली. ब्रिटनने दुसरा डाव ५ बाद १४५ धावांवर जाहीर केला आणि फ्रान्सला १८५ धावांचे आव्हान दिले. पण दुसऱ्या डावात फ्रान्सची पहिल्या डावापेक्षा आणखी दाणादाण उडाली. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. ब्रिटनकडून मॉटूग्यू टोलर यांनी ९ धावा देत सात विकेट घेतल्या आणि फ्रान्सचा डाव २६ धावांवर संपुष्ठात आला.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा एकमेव क्रिकेट संघ

ठळक मुद्दे

ऑलिम्पिकच्या इतिहासातील या एकमेव मॅचची बातमी ब्रिटन आणि फ्रान्समधील एकाही राष्ट्रीय वृत्तपत्रांनी छापली नाही. ब्रिटनमधील डेव्हॉन आणि वेस्ट कंट्री प्रदेशातील काही स्थानिक वृत्तपत्रांनी ब्रिटनच्या विजयाची बातमी छापली होती.

या सामन्यात दोन्ही संघात प्रत्येकी १२ खेळाडू होते आणि ही लढत दोन दिवस झाल्याने त्याला प्रथम श्रेणीचा दर्जा देखील मिळाला नाही.

१९०० साली ऑलिम्पिकमध्ये झालेली ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यातील मॅच ही त्या वर्षी झालेली एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच ठरली.

या लढतीनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळात सहभागी होण्यास फार देशांनी उत्सुकता न दाखवल्याने क्रिकेटचा ऑलिम्पिकमधील प्रवेश १९०४च्या स्पर्धेपासून थांबवला गेला. तो आजपर्यंत कायम आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऑलमपक #इतहसतल #एकमव #करकट #मच #य #दशन #जकल #हत #सवरणपदक

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष! ; भारत-इंग्लंड पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या...

Jio Plans: रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन फ्री राहा , Jio चा सर्वात वार्षिक प्लान, पाहा डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

नवी दिल्ली: Reliance Jio Annual Plans:टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या यूजर्सना वेळोवेळी अनेक फायदे ऑफर करत असते . किफायतशीर किमतीत चांगले प्लान उपलब्ध...

अखेर Bermuda Triangle चं रहस्य उलगडलं? प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा दावा की…

ऑस्ट्रेलिया : Bermuda Triangle च्या परिसरात विमान आणि जहाजं गायब झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. मात्र आता...

Todays Headline 7th July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...