Saturday, August 13, 2022
Home क्रीडा ऑलिम्पिकसाठी काय पण.... सिंधूने देशाचे नाव उंचावण्यासाठी केला होता 'या' दोन गोष्टींचा...

ऑलिम्पिकसाठी काय पण…. सिंधूने देशाचे नाव उंचावण्यासाठी केला होता ‘या’ दोन गोष्टींचा त्याग


Tokyo Olympics 2020 : टोकियो : वर्ल्ड चॅम्पियन सहाव्या मानांकित पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये कांस्य पदक जिंकले आणि इतिहास घडवला. तिने चीनच्या आठव्या मानांकित ही बिंग जिआओचा सरळ सेटमध्ये पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. तिने पाच वर्षांपूर्वी 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. या विजयासह तिने कुस्तीपटू सुशील कुमारशी बरोबरी साधली आहे. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने कांस्य पदक, तर 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकली आहेत. यासह तो दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता.

सिंधूच्या या यशाने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक मिळवून दिले. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली होती. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला होता. ऑलिम्पिकचे रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. तसेच बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारी ती पहिली खेळाडूही होती. अलीकडील अनेक वर्षात सिंधूने बॅडमिंटनमध्ये भारताला भरपूर यश मिळवून दिले आहे. त्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली आहे. 2016मध्ये पदक जिंकल्यानंतर ती म्हणाली होती की, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी ऑलिम्पिकपूर्वी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. तसेच आइस्क्रीम खाण्यावरही बंदी घातली होती. त्यानंतर जेव्हा सिंधूने रौप्य पदक जिंकले, तेव्हा तिने आईस्क्रीम खाल्ले होते.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्याशी संवाद साधला. तेव्हा मोदी म्हणाले होते की, ऑलिम्पिकमधून परत आल्यावर एकत्र आईस्क्रीम खाऊ. आता मोदी सिंधूला कधी भेटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंधूचे आई-वडील दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू राहिले आहेत. सिंधूचे वडील पी.व्ही. रमण्णा 1986च्या सेउल आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या व्हॉलीबॉल संघाचे भाग आहेत. तसेच त्यांना 2000 साली अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. आई-वडीलांनी दिलेला खेळाचा वारसा सिंधूने बॅडमिंटनद्वारे पुढे चालू ठेवला. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन कोर्टवर पाऊल ठेवले आणि वयाच्या 14व्या वर्षी ती आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळू लागली. सिंधूने वयाच्या 16व्या वर्षी ऑल इंग्लंड ओपनमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर हळूहळू ती यशाच्या पायऱ्या चढत गेली. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पाच पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. या स्पर्धेत तिने दोन कांस्य, दोन रौप्य आणि एक सुवर्ण पदक जिंकले आहे.

दरम्यान, 2018 आणि 2019 मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सिंधूचा समावेश होता. मार्च 2017 मधील इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात असे म्हटले होते की, विराट कोहलीनंतर सिंधूकडेच भारतातील सर्वाधिक जाहिराती आहेत. फेब्रुवारी 2019मध्ये, सिंधूने चीनी स्पोर्ट्स ब्रँड ली निंगसोबत चार वर्षांचा करार केला. हा करार 50 कोटी रुपयांचा होता. बॅडमिंटनच्या इतिहासातील सर्वात मोठ्या करारांपैकी हा एक आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऑलमपकसठ #कय #पण #सधन #दशच #नव #उचवणयसठ #कल #हत #य #दन #गषटच #तयग

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

स्मार्टफोन सारख्या फीचर्ससह लाँच झाली Maxima ची शानदार स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी पाहता आता अनेक कंपन्या कमी किंमतीत येणाऱ्या शानदार स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करत आहेत. यातच आता Maxima ने...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...

Relationship Tips : तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की विचारा ‘हे’ 4 प्रश्न, नाहीतर होईल पश्चाताप

मुंबई : लग्न हे एक नाजूक नातं आहे, या क्षणाची प्रत्येक मुलगा-मुलगी वाट पाहत असते. लग्नानंतर एक नवीन नात्याची सुरुवात होते, ज्यानंतर आयुष्यातील...

लग्नात नवरदेवाने भावी पत्नीचा सेक्स व्हिडिओ प्ले केला; बहिणीच्या नवऱ्यासोबत सुरू होतं लफडं

China Viral Wedding Video: लग्नातील एखादा व्हिडिओ व्हायरल होणे ही नवी गोष्ट नाही. पण गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर चर्चे असलेला एक व्हिडिओ...

मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यापर्यंत जाणून घ्या अक्रोडचे फायदे

Walnut Benefits : मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यापर्यंत जाणून घ्या अक्रोडचे फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...