Saturday, July 2, 2022
Home करमणूक ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राकडे अक्षय कुमारने व्यक्त केली खास इच्छा, गोल्डन बॉय करणार...

ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राकडे अक्षय कुमारने व्यक्त केली खास इच्छा, गोल्डन बॉय करणार पूर्ण?


हायलाइट्स:

  • अक्षय कुमारने व्यक्त केली नीरजकडे खास इच्छा
  • सोशल मीडियावर नीरजच्या बायोपिकची चर्चा
  • बायोपिकमध्ये भूमिका साकारणार अक्षय कुमार

मुंबई– टोकियो येथे झालेल्या २०२० सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक खेळात अतुलनीय कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. चहू बाजूंनी नीरजवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नीरजच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दलही सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. त्यात नीरजच्या बायोपिकमध्ये लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार असल्याचीदेखील चर्चा होती. परंतु, या चर्चा केवळ अफवा असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. याउलट अक्षयनेच अशी एक इच्छा बोलून दाखवली आहे जी फक्त नीरज पूर्ण करू शकतो असं अक्षयला वाटतंय.

सोनाली कुलकर्णीचा लाइव्ह ‘तमाशा’, मराठी चित्रपटात होणार अनोखा प्रयोग

नीरजच्या बायोपिकमध्ये अक्षय काम करणार असल्याची अफवा चाहत्यांनीच सोशल मीडियावर पसरवल्याचं सांगत अक्षयने म्हटलं. यावर बोलताना अक्षय म्हणाला की, ‘मी ते मीम्स पाहिलं ज्यात मी एक काठी नीरजने पकडलेल्या भाल्याप्रमाणे पकडली आहे. तो सीन ‘सौगंध’ चित्रपटातील आहे. लोकांनी तो फोटो व्हायरल करत लिहिलं की, मी तयारी सुरू केली आहे. मला तो फोटो पाहून हसायला आलं. असं काहीही नाहीये.’

तर दुसरीकडे एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने त्याच्या मनातील इच्छा व्यक्त करत म्हटलं, ‘मी तर म्हणेन की, नीरज चोप्रा खूप चांगला मुलगा आहे जर माझ्यावर बायोपिक बनली तर नीरज माझी भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारू शकतो.’

यापूर्वी २०१८ साली नीरजने दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलं होतं की, जर त्याच्या आयुष्यावर कोणताही चित्रपट बनला तर अक्षय कुमार किंवा रणदीप हुड्डा यांपैकी एकाने त्याची भूमिका करावी. परंतु, आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीरजने त्याची बायोपिक बनवायला नकार देत म्हटलं, ‘माझ्यावर कोणताही चित्रपट बनवू नका. मी अजून खेळतोय आणि यापुढेही खेळत राहणार. माझा बराच प्रवास बाकी आहे. मी अजून खेळून भारतासाठी आणखी पदकं जिंकू इच्छित आहे. जोपर्यंत मी खेळतोय तोपर्यंत माझ्या बायोपिकसाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल.’

‘कलाकारांना कोणीच वाली नाही, आमच्या वाट्याला सगळे सुग्रीवच!’अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऑलमपकवर #नरज #चपरकड #अकषय #कमरन #वयकत #कल #खस #इचछ #गलडन #बय #करणर #परण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प : एकनाथ शिंदे

मुंबई, 1 जुलै : शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज 'न्यूज18 लोकमत'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी...

टेस्ट मे बेस्ट! धोनी नाही तर ‘या’ कर्णधाराने जिंकवून दिले सर्वांधिक सामने

टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध सामन्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या कसोटी सामना खेळतेय.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

जेलमध्ये नेताना केतकी बरोबर घडलं असं काही भयानक, ऐका तिच्याच तोंडून

मुंबई 1 जुलै: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale arrest) च्या अटकेनंतर बरंच नाट्य घडलं होतं. या अभिनेत्रीला एका आक्षेपार्ह पोस्टमुळे तब्ब्ल 41 दिवस...

तरुणानं बॉसला मेसेज करताना वापरला असा शब्द, Whatsapp चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल

बॉसला व्हॉट्सऍप मेसेज किंवा ईमेल पाठवण्यापूर्वी आपण 10 वेळा विचार करतो किंवा तो मेसेज 10 वेळा वाचतो कारण, बॉससमोर एखादी चूक देखील आपल्याला...

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये विश्वास टिकवूणं सर्वात महत्त्वाचं, या टिप्स ठरतील..

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप (Long Distance Relationship) म्हणजे तुम्ही काय समजता? लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे फक्त एकमेकांना वेळ देणे किंवा एकत्र वेळ घालवणे नव्हे...

Sanjay Raut : संजय राऊत ईडी कार्यालयाबाहेर, दहा तास चालली चौकशी 

Sanjay Raut Ed Inquiry : दहा तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  ईडी  कार्यालयाबाहेर पडले आहेत....