Saturday, August 13, 2022
Home क्रीडा ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावले; आता खेळाडूच्या कुटुंबियांना मिळत आहे धमकी

ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावले; आता खेळाडूच्या कुटुंबियांना मिळत आहे धमकी


टोकियो: ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताची कामगिरी फार समाधानकारक झाली नाही. अनेक वैयक्तीक खेळात पदकाची अपेक्षा होती पण भारतीय खेळाडूंना यश आले नाही. असे असले तरी खेळाडूंनी त्याच्या परीने सर्वोत्तम कामगिरी केली आणि देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या महाराष्ट्रातील एका खेळाडूच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून धमकी दिली जात आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत सांघिक आणि वैयक्तीक प्रकारात सहभाग घेणाऱ्या साताऱ्याच्या प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना धमकी दिली जात आहे. जाधवच्या घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून ही धमकी दिली जात आहे.

वाचा- हॉकीत भारताचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्य पदकासाठी लढणार

प्रवीणने सांघिक प्रकारात अतानू दास आणि तरुणदीप राय सोबत भाग घेतला होता. तर मिश्र दुहेरीमध्ये देखील प्रवीणने दीपिकाकुमारी सोबत भाग घेतला होता. त्यांनी अंतिम ८ पर्यंत झेप घेतली होती. आता ऑलिम्पिकमधून परत आल्यानंतर प्रवीणने मिळवलेल्या यश पाहवत नसलेल्या शेजारी त्याला धमकी देणारे फोन करत आहेत.

प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साराडे गावचा आहे. जाधव कुटुंबातील चार जण एका झोपडी वजा घरात राहतात. जाधव लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले. यासंदर्भात जाधवने सांगितले की, सकाळी पाच सहा जण आले आणि माझ्या वडीलांना आणि काकांना धमकी देऊन गेले. आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, यासाठी त्यांचा विरोध आहे.

याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार आहोत. त्याला विरोध करत आहे. या घरात आम्ही अनेक वर्षापासून राहत आहोत, सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, असे जाधवने सांगितले.

भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू ऑलिम्पिकमधून थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेलेत. तेथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत. बुधवारीपासून ते नव्याने सुरुवात करतील. जाधव म्हणाला, माझे कुटुंबीयांना त्रास होत आहे आणि मी तेथे त्याच्या सोबत नाही. यासंदर्भात मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललो आहे, या गोष्टीत लक्ष घातलील.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऑलमपकमधय #दशच #नव #उचवल #आत #खळडचय #कटबयन #मळत #आह #धमक

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Most Popular

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...