पुढील लक्ष्य काय आहे, असं विचारलं असताना सिंधू म्हणाली की, ‘अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. मी लवकरच सराव सुरू करेन आणि मला आणखी चांगली कामगिरी करायची आहे आणि मी माझे सर्वोत्तम देऊ इच्छित आहे. स्पेनमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील आहे. मी 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नक्कीच खेळणार आहे, पण त्यासाठी बराच वेळ लागेल.”
कोरोना महामारीमुळं स्थगित करण्यात आलेली वर्ल्ड चॅम्पियनशिप 12 ते 19 डिसेंबर दरम्यान स्पेनच्या हुएल्वा येथे होणार आहे. महामारीच्या या काळात अनेक स्पर्धा रद्द झाल्यानंतर सिंधूने आपल्या डिफेन्सवर काम केले. मी आधीच वचन दिले की तुम्हाला नवीन स्ट्रोक आणि कौशल्य पाहायला मिळतील. ऑलिम्पिकमध्ये मी ते दाखवू शकले, याचा आनंद आहे. मी माझे प्रशिक्षक पार्क (तेई-सांग) यांची आभारी आहे. आम्ही दोघांनी टेक्निकवर खूप मेहनत घेतली.
सिंधूने सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये सातत्याने पदके जिंकली आहेत. 2018च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये रौप्य पदके जिंकल्यानंतर तिने BWF वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याआधी तिने दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. “गेली पाच वर्षे शानदार होती. हा एक अद्भुत प्रवास होता. चढ -उतार आले, पण मी खूप काही शिकले, खूप काही अनुभवले आणि खूप सुधारणाही केल्या.
2016ची ऑलिम्पिक खूप वेगळी होती. ती माझी पहिली ऑलिम्पिक असल्याने कोणतीही अपेक्षा नव्हती. पण रौप्य पदकाने माझं आयुष्य बदललं. यावेळी खूप अपेक्षा होत्या. आणि कांस्यपदक जिंकले, ही एक वेगळीच भावना आहे. रिओ ऑलिम्पिकवेळी मी सामान्य मुलगी होती, पण यावेळी प्रत्येकाला मी जिंकावं अशी इच्छा होती. त्यामुळे यावेळी खूप दबाव होता,” असंही सिंधूनं स्पष्ट केलं.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#ऑलमपकनतर #आत #सधच #ठरल #टकयनतर #आत #ह #आह #पढच #टरगट