Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल ऐश्वर्या ते प्रियंकासह या तारकांनी फॅशनच्या नावाखाली घातले विचित्र कपडे, बोल्ड लुकमुळे...

ऐश्वर्या ते प्रियंकासह या तारकांनी फॅशनच्या नावाखाली घातले विचित्र कपडे, बोल्ड लुकमुळे भडकले लोक


भारतामध्ये फॅशनच्या बाबतीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनाच सर्वाधिक फॉलो केले जाते. स्टाइलशी संबंधित असलेल्या या स्पर्धेमध्ये अभिनेत्री सुद्धा जगभरातील मोठ-मोठ्या ब्रँडपासून ते नवनवीन डिझाइनचे सुंदर आउटफिट्स परिधान करून पाहतात. यासाठी त्या बोल्ड फॅशन फॉलो करण्यासाठीही मागेपुढे पाहत नाहीत.

दरम्यान यापैकी काही कपडे इतके बोल्ड व विचित्र असतात की त्यांचा लुक पाहून ‘असे आउटफिट्स कसे कॅरी करतात?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच डोकावत असणार. तर दुसरीकडे बोल्ड व हॉट लुकमुळे या अभिनेत्रींना सोशल मीडियावर ट्रोलर्स आणि नेटकऱ्यांच्या रागाचाही मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. असेच काहीसे ऐश्वर्या रायपासून मलायका अरोरा व तारा सुतारिया यांच्यासह देखील घडल्याचं पाहायला मिळालंय.
(बाहुबली सिनेमातील या अभिनेत्रीचा अवतार पाहून लोक म्हणाले, ‘हे काय परिधान केलंय’)

​ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय – बच्चनने कान फिल्म फेस्टिव्हल २००४ साठी या ड्रेसची निवड केली होती. पण तिचा हा लुक आजही लोक विसरू शकलेले नाहीत. नैसर्गिक सौंदर्य आणि मोहक रूपासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीला जेव्हा नीता लुल्लानं डिझाइन केलेल्या या बॅकलेस – प्लंजिंग नेकलाइन ड्रेसमध्ये चाहत्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी थेट नापसंती दर्शवली. सोशल मीडियावर जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली. या बोल्ड डिझाइनर ड्रेसमुळे ऐश्वर्याला मोठ्या टीकेचाही सामना करावा लागला.

(ऐश्वर्या रायचे ते बोल्ड ड्रेस, ज्यामुळे बच्चन कुटुंब झाले होते नाराज! नातं बिघडेपर्यंत पोहोचलेलं प्रकरण?)

​प्रियंका चोप्रा

परदेशात गेल्यापासून प्रियंका चोप्रासाठी बोल्ड फॅशन म्हणजे खूपच सामान्य बाब झाल्याचे दिसतंय. ग्रॅमी अवॉर्ड्समधील तिचा हा बोल्ड लुक पाहून चाहते वाईटरित्या भडकले होते. या अभिनेत्रीने ‘Ralph and Russo’ ने डिझाइन केलेला गाउन परिधान केला होता. ज्यामध्ये डीप प्लंजिंग नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. या विंटेज स्टाइल ड्रेसमध्ये लाँग फ्रिंजिज, कफ्तान स्टाइल स्लीव्स, एम्ब्रॉयडर्ड ट्रेन आणि फ्रंट स्लिट डिझाइनचाही समावेश होता.

(बोल्ड ड्रेसमधील मलायका अरोराच्या दिलखेचक अदा, हॉट लुक पाहून नेटकरी म्हणाले ‘मेरे बचपन का प्यार’)

​मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बोल्ड व हॉट लुकसाठीच ओळखली जाते. आत्मविश्वास व स्टाइलने ती बोल्ड डिझाइनर आउटफिट कॅरी करते. या अभिनेत्रीच्या स्टाइल स्टेटमेंटशी स्पर्धा करणं मुळीच सोपी गोष्ट नाही. एका अवॉर्ड शोसाठी या अभिनेत्रीनं ‘Aadnevik’ने डिझाइन केलेले डीप नेकलाइन कट गाउन परिधान केले होते. ड्रेसमध्ये सेक्सी नेकलाइनसह सी-थ्रू मटेरिअलचा वापर करण्यात आला होता आणि थाय-हाय स्लिट डिझाइन लुकमुळे मलायका जबरदस्त हॉट दिसत होती. तिच्या चाहत्यांनी या लुकच कौतुक केलं पण काही लोकांनी तिच्यावर वाईटरित्या निशाणा साधला.

(शाहिदची पत्नी मीरा राजपूतने ब्रालेट घालून शेअर केला हॉट फोटो, बोल्ड लुक तुफान व्हायरल)

​तारा सुतारिया

मोहक सौंदर्याने सिनेरसिकांचे मन जिंकणाऱ्या तारा सुतारियाला बोल्ड कपड्यांमुळे नेहमीच टार्गेट केलं जातं. एका पार्टीसाठीही या अभिनेत्री हॉट लुकची निवड केली होती. काळ्या रंगाच्या ट्युब टॉपसह तिनं स्लिट डिझाइन मिनी स्कर्ट आणि प्रिंटेड ब्लेझर परिधान केलं होतं. या कपड्यांमुळे तिला बोल्ड व हॉट लुक मिळाला होता.

(लाल रंगाच्या बांगड्या-मंगळसूत्र घालून शॉपिंगसाठी निघाली दिशा परमार, राहुल वैद्यचा लुकही होता स्टायलिश)

​नुसरत भरूचा

बोल्ड, हॉट, सेक्सी… हे शब्द देखील नुसरतच्या या लुकसमोर कमीच वाटतील. एका इव्हेंटसाठी अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या वन शोल्डर गाउनची निवड केली होती. ज्यामध्ये एका बाजूस कमरेपर्यंत स्लिट डिझाइन आपण पाहू शकता. यामध्ये लेदर बेल्टचा समावेश करण्यात आला होता. स्लिट डिझाइनमुळे नुसरतच्या कमरेवरील टॅटू सुद्धा दिसत होतं. नुसरत भरूचाचा हा लुक जबरदस्त चर्चेत होता.

(करिश्माने स्वतःच्या लग्नात घातला या रंगाचा लेहंगा, बेबोसह मंडपात अशा अवतारात पोहोचली कपूर घराण्याची लाडकी लेक)

​उर्वशी रौतेला

नुसरतनंतर उर्वशीनंही अशा प्रकारचे आउटफिट परिधान केल्याचं पाहायला मिळालं. तिनं एका इव्हेंटमध्ये काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन गाउन परिधान केला होता. यामध्ये एका बाजूस लाँग टेल डिझाइन होती, तर दुसऱ्या बाजूस कमरेपर्यंत स्लिट डिझाइन आपण पाहू शकता. उर्वशीने या ड्रेसवर हील्स, बन, ग्लॉसी मेकअप आणि लाँग ईअररिंग्ज मॅच करून स्वतःला ग्लॅमरस लुक दिला होता. अभिनेत्रीचा हा लुक लोकांना तितकासा आवडला नाही आणि यामुळेच सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं.

(बसपन का प्यार! बालपणीच्या मैत्रिणीचं वहिनी म्हणून स्वागत करण्यासाठी ईशा अंबानीनं घातला इतका सुंदर लेहंगा)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऐशवरय #त #परयकसह #य #तरकन #फशनचय #नवखल #घतल #वचतर #कपड #बलड #लकमळ #भडकल #लक

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...