Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल ऐकावं ते नवलच! 20 वर्षे बाळासाठी करत होते प्रयत्न; नवऱ्याने ब्रेड खाणं...

ऐकावं ते नवलच! 20 वर्षे बाळासाठी करत होते प्रयत्न; नवऱ्याने ब्रेड खाणं सोडलं आणि 5 महिन्यांतच प्रेग्नंट झाली बायको


ब्रिटन, 04 ऑगस्ट : आई-वडील (Mother parents) होणं हा प्रत्येक दाम्पत्याच्या (Couple) आयुष्यातील अविस्मरणीय, सुंदर असा क्षण असतो. पण काही दाम्पत्यांना काही कारणांमुळे हे सुख लाभत नाही. किमान एक तरी मूल व्हावं, यासाठी मग या दाम्पत्याची धडपड सुरू होते. वेगवेगळे उपचार केले जातात. ब्रिटनमधील (Britain couple) अशाच एका दाम्पत्याला दोन दशकांनी मूल झालं. पण ते कोणत्याही उपचाराने नाही तर फक्त आहारातील एका बदलामुळे. ब्रेड खाणं सोडलं आणि त्यांच्या पदरात मूल पडलं (Couple conceive baby after stop eating bread).
मोंटगोमेरीमध्ये राहणारा 55 वर्षांचा स्टिफन आणि त्याची 41 वर्षांची बायको रेचल ग्रीनवुड. या दाम्पत्याला अशा काही आरोग्याच्या समस्या होत्या ज्यामुळे त्यांना मूल होण्याची शक्यता कमी होती. आयव्हीएफमार्फतसुद्धा त्यांना मूल होणं कठीण होतं. त्यामुळे त्यांना मूल होणारच नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
रेचलला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे. तर स्टिफनसोबत लहानपणी अशी दुर्घटना झाली, ज्यामुळे त्याचे शुक्राणू खूप कमी झाले होते. स्टिफनला डायबेटिजही होतं. त्यामुळे त्याला यीस्ट इन्फेक्शन व्हायचं. याचाही परिणाम त्याचा स्पर्म काऊंटवर होत होता. दोघांचीही समस्या पाहता डॉक्टरांनी त्यांना मूल होणारच नाही असं स्पष्टपणे सांगितलं. यामुळे हे दाम्पत्य नाराज होतं.
हे वाचा – वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster
अखेर स्टिफननं यीस्ट इन्फेक्शनमुळे आपल्या आहारातील यीस्ट प्रोडक्ट्स हटवले. त्याने ब्रेड आणि पेस्ट्री खाणं बंद केलं. यानंतर दोन आठवड्यांत त्याचं इन्फेक्शन संपलं आणि पाच महिन्यानंतर रेचल प्रेग्नंट असल्याची बातमी मिळाली.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार फेब्रुवारी, 2021 मध्ये  रेचलला किडनी स्टोनच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांत तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या. तिची त्वचा पिवळी प़डू लागली. रेचलला नेमकं झालं तरी काय म्हणून तिची तपासणी केली. त्यावेळी रेचल प्रेग्नंट असल्याचं समजलं. यानंतर या दाम्पत्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.
हे वाचा – बॅक्टेरियांमुळे दीर्घायुष्य; शतक गाठणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यात असतात हे जीवाणू
दोन दशकांपासून हे कपल मुलासाठी प्रयत्न करत होतं. पण आहारातील एका बदलामुळे 5 महिन्यांतच त्यांच्या पदरात हे सुख पडलं. 1 जुलै, 2021 रोजी त्यांच्या बाळाने जन्म घेतला. त्याच्या जन्मानंतर दोघंही खूप आनंदी आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऐकव #त #नवलच #वरष #बळसठ #करत #हत #परयतन #नवऱयन #बरड #खण #सडल #आण #महनयतच #परगनट #झल #बयक

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Sanjay Sirsath : शिंदेंनी शब्द दिला होता, मी मंत्रिमंडळात राहणार- शिरसाट

शिंदेंनी शब्द दिला,मी मंत्रिमंडळात राहणार, ठाकरे सरकारमध्येही यादीत नाव असताना वगळलं होतं, मंत्रिमंडळात मी असणार- संजय शिरसाट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

प्रफुल्ल पटेल तुमच्यामुळे हे सर्व घडतंय; ‘फिफा’ची भारताला धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली-सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे....

पुण्यात चंद्रकांत पाटील नाही तर राज्यपालच करणार15 ऑगस्टला ध्वजारोहण

Pune independence day 2022: पुण्यात (Pune)15 ऑगस्टचे ध्वजारोहण कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील  पुण्याऐवजी कोल्हापूरला (Kolhapur) करणार आहेत. तसं...

VIDEO – भरधाव बसला पाहून जीव वाचवण्यासाठी धडपडले पण…; गाडीने कुटुंबाला उडवलं

मुंबई, 12 ऑगस्ट : मृत्यू कधी, कुठे, कसा आणि कोणत्या रूपात येईल आणि या मृत्यूतून कोण, कधी, कसं वाचेल हे सांगू शकत नाही. कारण...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

ओप्पोचे सॅमसंगच्या पावलावर पाऊल, ३२MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोनची किंमत केली खूपच कमी; स्वस्तात खरेदीची संधी

नवी दिल्ली : सॅमसंगने गेल्याकाही दिवसात आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगच्या पावलावर पाऊल टाकत आता ओप्पोने देखील आपल्या फ्लॅगशिप फीचर्ससह...