या मालिकेचा दुसरा भाग सुद्धा प्रेक्षकांकडून बराच पसंत केला जात आहे. अजितकुमारचा डाव अजूनतरी लक्षात आला नसला तरी मार्तंड नेहमीच त्याच्या मागावर असल्याचं मालिकेत पाहायला मिळत. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अजितकुमार त्याने केलेल्या (Devmanus 2 latest update) खुनांची कबुली देताना दिसत आहे.
या नव्या प्रोमोमध्ये जामकर अजितकुमार आणि डिम्पल यांना पोलीस स्टेशनला येऊन जायचा निरोप ठेऊन जातो तर डॉक्टर हा आमदार बाईंच्या मिरवणुकीत नाचताना दिसतो अशी खबर जामकरांना एक माणूस देतो. डॉक्टर स्वतःहून जामकरांच्या दारात येऊन स्वतःच्या खुनांची कबुली देताना दिसतो. “हे जेवढे खून आहेत ते मीच केलेत, एक नाही, दोन नाही, चार नाही तर अडतीस… काय करायचं ते करा” अशा शब्दात अप्रत्यक्षपणे अजितकुमार जामकरांना धमकी देतो असं पाहायला मिळत आहे. यावर आता जामकरांचं पुढचं पाऊल काय असणार आणि ते डॉक्टरला गुन्हेगार कसं सिद्ध करणार हे पाहून रंजक ठरणार आहे.
हे ही वाचा- अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ? काय घडणार येत्या भागात?
सध्या मालिकेत एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर यांची जवळीक वाढताना दिसत आहे. डॉक्टरांशी केवळ समाजाला दाखवायला म्हणून केलेलं खोटं लग्न डिम्पलच्या अंगाशी येणार असं दिसत आहे. डिम्पल आणि डॉक्टर यांच्यात वाढती जवळीक तिला डॉक्टरची पुढची शिकार बनवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
देवमाणूसच्या दुसऱ्या भागाने प्रेक्षकांची काहीशी निराशा केली असल्याने मालिकेचा शेवट जवळ आला का अशी शंका वर्तवली जात आहे. या मालिकेचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. नुकतीच या मालिकेत हवा येऊ द्या फेम अभिनेत्रीची एंट्री सुद्धा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#एकदन #नह #खन #मच #कल #जमकरसमर #कबल #दणऱय #अजतच #नव #खळ