एका यूट्यूबरने आपला आयफोन एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न केला. 100 चार्जरचा वापर करुन आयफोन किती वेळात चार्ज होऊ शकतो असं एक्सपेरिमेंट केलेला व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
iPhone 6S लवकरात लवकर चार्ज करण्यासाठी एका यूट्यूबरने भन्नाट ट्रिक वापरली. त्याने फोन चार्ज करण्यासाठी 100 चार्जरचा वापर केला. इतक्या चार्जरचा वापर करुन आयफोन किती लवकर चार्ज होतो, हे त्याला पाहायचं होतं. एकावेळी त्याने दोन iPhone 6S चा या एक्सपेरिमेंटसाठी वापर केला. एका iPhone 6S ला सिंगल चार्जरसह जोडलं. तर एक फोन 100 चार्जरच्या एका पीनला जोडला. दोन्ही फोनची बॅटरी पूर्णपणे संपलेली होती.
तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी
100 चार्जरचा वापर करुन चार्ज केलेला फोन अतिशय लवकर चार्ज होईल असं वाटू शकतं. परंतु असं झालं नाही. 100 चार्जरने फोन लवकर तर चार्ज झाला, पण सिंगल चार्जरवाला फोनही मागे नव्हता. 100 चार्जरवाला फोन 15 मिनिटांत 100 टक्के चार्ज झाला. तर सिंगल चार्जरवाला फोन 20 मिनिटांत चार्ज झाला.
Mobile Phone चोरी झाल्यास आता सरकारच करणार मदत, करावं लागेल हे एक काम
हा व्हिडीओ आतापर्यंत 3 कोटीहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. एक्सपेरिमेंट यूट्यूबर TechRax ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#एकदन #नह #तर #तबबल #चरजरन #चरज #कल #iPhone #पढ #नमक #कय #झलपह #VIDEO