तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नातं ज्या कारणामुळे तुटलं ती गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव टाकते. ‘एक्स’ आणि तुम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्यास, याचा परिणाम तुमच्या प्रोफेशनल लाईफवरही (Working with your ex) पडतो. तुमची भांडणं झाली असोत, वा तुमच्या मनात अजूनही त्या व्यक्तीबद्दल फीलिंग्ज असो, अशा दोन्ही बाबतीत तुमच्या भावना तुमच्या कामावर प्रभाव पाडू लागतात. त्यामुळे वेळीच स्वतःला सावरून, कामावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी या टिप्स तुमच्या कामी येतील.
तुमची वागणूक सामान्य ठेवा
कित्येक जण आपल्या ‘एक्स’ला पाहून वेगळ्याच प्रकारे वागू लागतात. आपल्या भावनांवर आवर न ठेवता आल्यामुळे, त्यांच्या वागणुकीतील हा बदल अगदी स्पष्टपणे जाणवतो. ‘एक्स’शी कडाक्याचं भांडण झाल्यामुळे, किंवा विश्वासघातामुळे नातं तुटलं असल्यास या व्यक्तींच्या मनात ‘एक्स’बद्दल राग असतो. हाच राग त्यांच्या कामातून, किंवा ‘एक्स’ समोर व्यक्त होतो. असं न होऊ देणं गरजेचं आहे. आपल्या भावनांना (Keep your feelings in control) आवर घालून, वागणूक सामान्य ठेवल्यास तुमच्या कामावर चुकीचा प्रभाव पडत नाही.
खासगी गोष्टींची चर्चा टाळा
एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे तुमच्या ‘एक्स’सोबत बोलण्याची वेळ तर नक्कीच येते. अशावेळी जुन्या किंवा खासगी गोष्टी (Avoid discussing past life with ex) बोलणं टाळा. केवळ कामासंबंधी गोष्टींची चर्चाच तुम्ही तुमच्या ‘एक्स’सोबत करणं शहाणपणाचं ठरेल. जुन्या गोष्टींबाबत चर्चा किंवा वाद घालण्यासाठी ऑफिस हे योग्य ठिकाण नाही हे लक्षात घ्या.
सहकाऱ्यांना देऊ नका कल्पना
तुमच्या सहकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना देऊ नका की तुमची ‘एक्स’ देखील याच ऑफिसमध्ये आहे. असं केल्याने ती व्यक्ती गॉसिपचा विषय होऊ शकते. तुमच्या ‘एक्स’ला देखील तुम्ही सहकाऱ्यांना खासगी गोष्टी सांगितलेलं रुचणार नाही. तसंच, सहकारी तुम्हालादेखील जज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी तुमच्यापुरत्याच ठेवा.
दुसरा पर्याय तयार ठेवा
एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या ‘एक्स’ला एकाच प्रोजेक्टवर किंवा एकाच टीममध्ये काम करावं लागण्याची शक्यता असतेच. यामुळे ज्या व्यक्तीला तुम्हाला खरं तर टाळायचं आहे, तिच्यासोबतच अधिक बोलण्याची वेळ येऊ शकते. असं होऊ नये यासाठी आधीच तुम्ही तुमच्या टीमसाठी दुसरा पर्याय, किंवा स्वतःच दुसऱ्या टीममध्ये जाण्याचा पर्याय निवडून ठेवणं फायद्याचं ठरतं.
अशाप्रकारे तुमची ‘एक्स’ आणि तुम्ही एकाच ऑफिसमध्ये असूनही, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#एकसबरबर #एकच #ऑफसमधय #आहत #फल #कर #य #टपस #कमवर #नह #हणर #परणम