Saturday, May 21, 2022
Home करमणूक एका चुकीमुळे उध्वस्त झालं अभिनेता शायनी आहुजाचं आयुष्य!

एका चुकीमुळे उध्वस्त झालं अभिनेता शायनी आहुजाचं आयुष्य!


Shiney Ahuja Birthday : बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजा (Shiney Ahuja) आज (15 मे) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. शायनीचा जन्म 15 मे 1975 रोजी डेहराडूनमध्ये झाला. एक काळ असा होता की, हा अभिनेता बॉलिवूडमध्ये वेगाने प्रसिद्धी मिळवत होता. आगामी काळात आपल्या अभिनयाने बड्या कलाकारांना पराभूत करून स्वत:चे मोठे स्थान निर्माण करेल, असा विश्वासही त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना वाटत होता. पण, बॉलिवूडच्या या उगवत्या ताऱ्याकडून झालेल्या एका चुकीने त्याचे सर्व काही हिरावून घेतले. बॉलिवूडमधील एक उगवता तारा पार बुडूनच गेला..

शायनी आहुजाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’ या पहिल्याच चित्रपटातून शायनीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार देखील मिळाला. त्याकाळात असे म्हटले जात होते की, शायनी आता या इंडस्ट्रीत आपले भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

तुरुंगात रवानगी झाली अन्…

पण, या यशादरम्यान, शायनीबद्दल एक अशी बातमी आली, ज्याने संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून सोडले. त्याच्यावर घरातील मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. येथून त्याच्या बहरत असलेल्या कारकीर्दीचा शेवट सुरू झाला. बॉलिवूडमध्ये शायनी आहुजा जितक्या वेगाने वर जात होता, तितक्याच वेगाने तो खाली पडला. जेव्हा असे आरोप केले जातात, तेव्हा तुम्ही कितीही मोठे स्टार असाला तरी, तुमच्या पाठीशी कोणीही उभे राहणार नाही.

कमबॅकही ठरले फ्लॉप!

बलात्काराच्या आरोपानंतर शायनी जवळपास दोन वर्षे इंडस्ट्रीतून गायब होता. चाहतेही हळूहळू त्याला विसरून गेले. 2012 मध्ये शायनीने ‘भूत’ चित्रपटातून पुनरागमन केले, मात्र या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तब्बल दोन वर्षे शायनी पुन्हा दिसला नाही. 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात दिसला, पण त्यानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावरून गायब झाला. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मिळाला. पण, शायनी बॉलिवूडमध्ये पुन्हा कधीही चमकू शकला नाही.

हेही वाचा :अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#एक #चकमळ #उधवसत #झल #अभनत #शयन #आहजच #आयषय

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या...

Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट

<p>मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे...

राज्यात 311 कोरोना रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत

महाराष्ट्रात कोरोनाचे 311 नवीन रुग्ण आढळले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3...

तुमचा Phone Call गुपचूप कोणी Record करतंय का? असं येईल ओळखता

नवी दिल्ली, 21 मे : जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती असेल. अनेकजण फोनवर बोलताना वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. काही महत्त्वाच्या...

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...