Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या एकनाथ शिंदे सरकारची उद्या बहुमत चाचणी, शिंदे गटाची सरशी, शिवसेनेचा व्हिप रद्द

एकनाथ शिंदे सरकारची उद्या बहुमत चाचणी, शिंदे गटाची सरशी, शिवसेनेचा व्हिप रद्द


मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची उद्या परीक्षा आहे. उद्या सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. 

दरम्यान, आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाईत तर जिंकली आहे. आता उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी त्यांची खरी परीक्षा आहे. 

शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम
विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर आज शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. 

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती आता रद्द करण्यात आली आहे. तसा आशयाचं एक पत्र विधानमंडळ सचिवानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटनेतेपदी कायम ठेवण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#एकनथ #शद #सरकरच #उदय #बहमत #चचण #शद #गटच #सरश #शवसनच #वहप #रदद

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर…

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...

WhatsApp, Messenger नोटिफिकेशन्स नकोय, ते थांबवण्यासाठी काय कराव लागेल, जाणून घ्या

मुंबई : WhatsApp आणि Messenger हे जगभरात सर्वाधिक वापरले जाते. पण कधी कधी WhatsApp आणि Messenger च्या सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे डोकेदुखी वाढली आहे....

देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या युवा दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्त्व

International Youth Day 2022 : आजची तरूण पिढी ही उद्याचं भविष्य आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच राष्ट्राच्या उभारणीत...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...