एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेले चार मुद्दे नेमकं काय?
1) गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
2) घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
3) पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
4) महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद झाल्यानंतर त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर ओढावलेल्या पेच प्रसंगावर मंथन झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजीनामा द्यायची तयारी आहे. ते वर्षा सोडून त्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी जाण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुक लाईव्हमध्येही याबाबत उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#एकनथ #शद #मग #हटयल #तयर #नहत #चर #नव #टवट