Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या एकनाथ शिंदेंसोबतच्या 40 आमदारांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई!

एकनाथ शिंदेंसोबतच्या 40 आमदारांच्या पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई!


Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. मात्र याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.  पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. 

राज्य सरकार या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या  सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे. 

 बंडखोरी  करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु ?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी  करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून ‘एबीपी माझा’ला मिळाली आहे. 

एकनाथ शिंदेंच्या बंडाळी प्रकरणी शरद पवार Intelligence Department वर नाराज आहेत. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश

Maharashtra Political crisis : 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : राज्यातील सत्तासंघर्षाचा चौथा दिवस, अपडेट्स एका क्लिकवर..अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#एकनथ #शदसबतचय #आमदरचय #परसनल #सकयरट #ऑफसर #कनसटबल #कमडवर #करवई

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Actor Santosh Juvekar Facebook Page Hacked And Shares Adults Picture By hacker nrp 97 | “माझ्या फेसबुकवर फारच अश्लील फोटो…”, संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट...

मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार...

शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा, दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून

Maharashtra Politics LIVE Updates : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार...

IT नियमाचा तडाखा! एकट्या फेसबुककडून 1.75 कोटी पोस्टवर कारवाई

नवी दिल्ली, 3 जुलै : सध्या देशात दिवसेंदिवस सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये सोशल मीडियाचा (IT Rules 2021) मोठ्या प्रमाणात वापर...

“काय झाडी, काय डोंगार, काय प्राजक्ता…”; प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची चर्चा, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट | actress prajakta mali share photos video rainy trip lonavala...

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा...

जसप्रीत बुमराहने एका षटकात 35 धावा केल्यानंतर अँडरसन म्हणाला, “स्टुअर्ट ब्रॉड…”

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...