मनोरंजन सृष्टीत सतत काही ना काही घडामोडी घडत असतात. चाहते नेहमीच आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. दरम्यान मराठीतील प्रसिद्ध जोडी उर्मिला आणि आदिनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्यात काही बिनसल्याचं म्हटलं जात आहे. ही चर्चा फक्त इथेच नाही थांबली तर असंदेखील म्हटलं जात आहे, की उर्मिला आणि आदिनाथमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसपूस सुरु आहे. त्यामुळे हे दोघे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत.
आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण अभिनेता आदिनाथ कोठारेने स्वतः या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली आहे. पिपींगमून या मराठी वेबसाईटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या रिपोर्टनुसार, आदिनाथने या विषयावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, ”उर्मिला आणि माझ्यात सर्वकाही छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत. माझ्या आणि उर्मिलाबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्या आणि चर्चा करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही’. असं म्हणत अभिनेत्याने या चर्चानां पूर्णविराम लावला आहे.
उर्मिला-आदिनाथ लव्हस्टोरी:
उर्मिला आणि आदिनाथची ओळख एका चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. तर तेव्हाच तो तिच्या प्रेमातही पडला होता.’शुभमंगल सावधान’ या चित्रपटातून उर्मिलाने पहिल्यांदाच मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. तर हा चित्रपट कोठारे प्रोडकेशनचा होता. आणि आदिनाथ त्यावेळी चित्रपटाचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहात होता.पण त्यांची भेट ही सेट वर नव्हे तर घरी झाली होती. चित्रपटाच्या कामानिमित्त उर्मिला कोठारेंच्या घरी आली होती. तेव्हा आदिनाथने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. तर ‘तेव्हाच आपण प्रेमात पडलो.’ असं आदिनाथ सांगतो. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यांनंतर 20 डिसेंबर 2011 मध्ये त्यांनी विवाह केला.या दोघांना जिजा नावाची एक गोंडस लेकसुद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#उरमलआदनथमधय #खरच #बनसलय #अभनतयन #सवत #कल #खलस