आपण आत्तापर्यंत पाहिलं की उर्फी अनेक वेगवेगळ्या गोष्टींपासून कपडे बनवत असते. नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करुन ती लोकांसमोर येत असते आणि चर्चेचा केंद्रबिदू ठरत असते. परिणामी उर्फी पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत आली आहे. उर्फीनं (Urfi New look) तिचा नवा लूक एका मोठ्या आणि जाड वायरपासून (Urfi New Wire look) बनवला आहे. त्यामुळे उर्फीच्या फॅशन सेन्सला खरंच दाद द्यावी लागेल. कारण उर्फी कशापासून कोणता ड्रेस तयार करेल याचा नेम नाही.
हे ही वाचा – ‘निवडणुकांऐवजी दर 5 वर्षांनी…’, महाराष्ट्रातील राजकीय गोंधळावर अभिनेत्री स्वरा भास्करचं ट्विट चर्चेत
उर्फीनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा नवा लूक पहायला मिळतोय. नव्या लूकमध्ये उर्फीनं विजेच्या वायरचा वापर केला असून यापासून एक शाॅर्ट ड्रेस बनवली आहे. निळ्या वायरपासून उर्फीनं ब्रालेट टाॅप आणि स्कर्ट बनवला आहे. तिच्या या शाॅर्ट ड्रेसनं चाहत्यांना मात्र वेडं केलं आहे. उर्फीच्या या नव्या लूकचं चाहते कौतुक करत आहेत तर अनेकजण तिला ट्रोलही करत आहेत.
दरम्यान, उर्फी जावेदनं शेअर केलेला हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून लाईक्सचाही वर्षाव होत आहे. उर्फीच्या क्रिएटिव्हिटीची दादा द्यावी लागेल कारण ती कुठून काय संकल्पना घेऊन येते आणि नवनवीन कपडे बनवते कुणीही तर्क लावू शकत नाही.
Published by:Sayali Zarad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#उरफ #जवदच #नव #लक #वहयरल #वयरपसन #बनवल #डरस