Thursday, July 7, 2022
Home भारत उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवली; भाजप, काँग्रेससह आठ पक्षांना दंड

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवली; भाजप, काँग्रेससह आठ पक्षांना दंड


हायलाइट्स:

  • उमेदवारी जाहीर केल्यापासून ४८ तासांच्या आत गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करणं आवश्यक
  • सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये दिले होते आदेश
  • माकप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड
  • भाजप, काँग्रेस, भाकप, जदयू, राजद, लोजप यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

राजकीय पक्षांनी उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संताप व्यक्त केला. या संदर्भात आपल्या अलीकडच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह आठ पक्षांना एक लाख ते पाच लाख रुपये दंड ठोठावला.

निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना राजकीय पक्षांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील जाहीर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये दिले होते. न्यायालयाने तेव्हा असेही बजावले होते की, राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांची विस्तृत माहिती उमेदवारी जाहीर केल्यापासून ४८ तासांच्या आत आपल्या वेबसाइटवर जाहीर करावी. मात्र न्यायालयाच्या या आदेशांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर दोषी ठरलेल्या आमदार आणि खासदारांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्या. सूर्या कांत आणि न्या. विनीत सरण यांच्या खंडपीठासमोर सुनवाणी झाली. यावेळी खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांवर संताप व्यक्त केला. सन २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, भाजप, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), जनता दल (युनायटेड), राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि लोक जनशक्ती पक्ष (लोजप) यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकारणात प्रवेश मिळू नये यासाठी वेळोवेळी संसद सदस्यांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. मात्र हे आवाहन म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ठरले आहे. राजकीय पक्ष गाढ झोपेतून जागे होण्यास तयारच नाहीत. देशात राजकीय व्यवस्थेतील गुन्हेगारीकरण दिवसेंदिवस वाढतच असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

Jammu Kashmir : पृथ्वीवरचा स्वर्ग नकोसा, ‘नवकाश्मिरा’त केवळ दोघांचीच जमीनखरेदी
NRC: देशव्यापी ‘एनआरसी’चा अद्याप निर्णय नाही, मोदी सरकारची माहिती
परवानगीनंतरच खटले मागे

लोकप्रतिनिधींवर दाखल असलेले खटले मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयाची अनुमती आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र आणि सीबीआयसारख्या संस्थांकडून यासंदर्भात आवश्यक स्थिती अहवाल दाखल न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या विरोधातील फौजदारी खटल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन करण्याचे संकेतही यावेळी खंडपीठाने दिले. फौजदारी खटल्यांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांसंदर्भात हा आदेश महत्त्वपूर्ण ठरणार असून राज्याच्या वकिलांच्या अधिकारात न्यायालयाने कपात केली आहे. उच्च न्यायालयाच्या पूर्वमंजुरीशिवाय आता लोकप्रतिनिधींवरील खटले मागे घेता येणार नाहीत. न्या. विनीत सरन आणि न्या. सूर्यकांत यांचाही खंडपीठामध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी फौजदारी दंडविधान, कलम ३२१चा वापर करून लोकप्रतिनिधींच्या विरोधातील खटले मागे घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला महत्त्व आहे. खासदार आणि आमदारांविरोधातील खटल्यांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांची पुढील आदेश होईपर्यंत बदली होणार नाही, मृत्यू आणि सेवानिवृत्ती हे याला अपवाद असतील, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

shiv sena :’भाजपसोबत सत्तेत असताना सोन्याच्या ताटात जेवताना गोड लागलं’, प्रीतम मुंडे, नवनीत राणांचा लोकसभेत हल्लाबोल
pm modi : राज्यसभेत गैरहजर असणाऱ्या भाजप खासदारांची PM मोदींनी नावं मागितली, सूत्रांची माहिती
लोकप्रतिनिधींवरील प्रलंबित खटले वाढतेच

कठोर देखरेख आणि सूचनांनंतरही संसदेतील लोकप्रतिनिधी आणि आमदारांवरील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढतच असल्याची माहिती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. प्रलंबित खटल्यांची संख्या डिसेंबर २०१८ मध्ये ४,१२२ होती. ती वाढून सप्टेंबर २०२०मध्ये ४,८५९वर पोहोचली आहे. न्यायालयाने ज्येष्ठ वकील विजय हंसारिया यांची या प्रकरणात न्यायालयाचे मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. लोकप्रतिनिधींवरील फौजदारी गुन्ह्यांचा लवकर निपटारा करावा, यासाठी याचिका दाखल असून त्यात हंसारिया मदत करत आहेत. प्रलंबित खटल्यांची संख्या वाढण्यास विविध घटक कारणीभूत ठरत असल्याचेही सांगण्यात आले. हंसारिया यांनी या प्रकरणात १३वा अहवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना सादर केला.

Pegasus Case: समांतर चर्चेस आक्षेप, पेगॅसस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
Lok Sabha passes constitutional amendment bill : लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर, आता राज्यसभेत मांडणारअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उमदवरच #गनहगर #परशवभम #लपवल #भजप #कगरससह #आठ #पकषन #दड

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

MS Dhoni : बापरे! वाढदिवसाच्या दिवशी धोनी लंडनच्या रस्त्यावर करतोय ‘हे’ काम

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि...

Special Report : नाशकातल्या येवला तालुक्यात एका अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या

<p>&nbsp; Special Report :&nbsp; नाशकातल्या येवला तालुक्यात एका अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये..संपत्तीच्या वादातून निकटवर्तीयांकडूनच ही हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न...

Devmanus 2: अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ?

मुंबई, 06 जुलै: झी मराठीच्या 'देवमाणूस 2' ( Devmanus 2) या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे...

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष! ; भारत-इंग्लंड पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या...