Friday, May 20, 2022
Home लाईफस्टाईल उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध 'या' फळभाज्या खा; फिट राहा

उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध ‘या’ फळभाज्या खा; फिट राहा


Vitamin C Benefits : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होतं. याचाच मोठा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशातच संसर्ग आणि असंसर्गजन्य आजार (NCDs) रोखण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. भारतात असंसर्गजन्य आजार अत्यंत तीव्र गतीने वाढत आहे. आपल्या देशात कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, कर्करोग, श्वसनाचे आजार आणि मधुमेह आजार खूप तीव्र गतीने वाढत आहे. 

उन्हाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, आपण आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या समाविष्ट करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन सी शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. वृद्धत्व टाळण्यासाठी आणि तरुण ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते.

व्हिटॅमिन सी युक्त फळ भाज्या : 

1. टोमॅटो – टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोची भाजी किंवा सॅलडमध्ये वापर करून तुम्ही दररोज व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करू शकता. 

2. आवळा – आवळा भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. मध्यम आकाराच्या आवळ्यामध्ये 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. 

3. लिंबू – लिंबाचा वापर रोज जेवणात जरूर करावा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने तुम्ही तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन सीच्या गरजा पूर्ण करू शकता. 

4. ब्रोकोली – हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. ब्रोकोली व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन ए देखील ब्रोकोलीमध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. 

5. बटाटा – बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. बटाटे सर्व घरांमध्ये वापरले जातात. बटाट्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#उनहळयत #परतकरशकत #वढवणयसठ #वहटमन #स #समदध #य #फळभजय #ख #फट #रह

RELATED ARTICLES

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’

RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...